मुंबई : आपल्या आजूबाजूना आपल्या नकळत अनेक गोष्टी घडत असतात. परंतु त्यांपैकी काही गोष्टी घडण्याचा आपल्या आयुष्यावर फरक पडतो, तर काही गोष्टींचा आपल्या आयुष्यावर फरक होत नाही. त्यांपैएक आहे हे म्हणजे मांजर आपल्या रस्त्यातून आडवी जाणे.ही एक प्रकारे अंधश्रद्धाच आहे, पण वास्तुशास्त्रात त्यामागचं एक मोठं कारणही सांगितलं गेलं आहे. खरंतर मांजर आपल्या रस्त्यातून आडवी गेल्यामुळे बरेच लोक रस्ताबदलून पुढे जातात, तर काही लोक थूंकतात आणि मग पुढे जातात. तर काहीवेळा लोक त्याकडे लक्ष न देता पुढे जातात. पण हे माणसाच्या विचारावर आणि विश्वासावर अवलंबून असते की, तो आपल्या आयुष्यात काय करतो आणि काय नाही.
परंतु बऱ्याच लोकांना यामागचं कारण माहित नसतं की, मांजर जर आडवी गेली, तर त्याचं लोकांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो.
पण आज आम्ही तुम्हाला याच्याशी संबंधित अशी काही खास कारणं सांगणार आहोत, जी तुम्हाला कदाचितच माहीत नसतील.
- भारतीय संस्कृतीत काळ्या रंगाला शनिदेवाचा रंग म्हटले जाते. त्याचबरोबर मांजरीलाही राहूची सवारी सांगितली जाते. त्यामुळे काळी मांजर दिसली तर शनि आणि राहूचा प्रकोप होणार आहे, असे गृहीत धरले जाते.
खरंतर जुन्या काळात लोक बैलगाडीने प्रवास करायचे, कारण त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. परंतु तेव्हा देखील असं म्हटलं जायचं की, बैलगाडीसमोरुन मांजर गेली, तर त्यामुळे लोकांना दुखापत होते, तसेच बैलांना देखील काही अशुत्र संकेत मिळतात.
परंतु असे काही नाही, खरंतर बैल मांजराना घाबरतात, म्हणून जर रस्त्यातून मांजर आडवी गेली, की ते थांबायचे किंवा मग ते भितीने काहीतरी हालचाल सुरु करायचे, ज्यामुळे प्रवाशांचा तोल जाऊन त्याना बऱ्याचदा दुखापत झाली आहे.
तसेच असं झाल्यानंतर बैलगाडी चालक बैलांना शांत करायचा आणि मग तेथून गाडी घेऊन पुढे जायचा.
परंतु यासंबधी अशी अंधश्रद्धा वापरली जाते की, म्हणून मांजर आडवी गेल्यानंतर काही काळ थांबावे आणि मग पुढे चालत जावे.
सनातन धर्मात मांजरींना पाळीव प्राणी म्हणून पाळणे हे अत्यंत वाईट मानले जाते, असेही आपल्याला अनेकदा सांगितले जाते. या गोष्टीचा परिणाम माणसावर होऊ लागतो. पण हे अंधश्रद्धेशिवाय दुसरे काही नाही.
खरंतर मांजरीला पाहून प्राणी किंवा माणसं पळून जातात, असं अनेक वेळा पाहायला मिळतं. ज्यामुळे मांजरीला ठेवणे अशुभ मानले जाऊ लागले. परंतु अंधश्रद्धे शिवाय यामागे काहीही नाही.