मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत आहेत. त्याचा परिणाम नकळत चांगला वाईट इतर बारा राशींवर होत असतो. तो ग्रह तुमच्या कुंडलीत कोणत्या स्थानी आहे यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. 15 जून रोजी सूर्य देव मिथून राशीमध्ये प्रवेश करत आहे.
सूर्याचा मिथुनेतील प्रवेश हा काही राशींसाठी मोठं वरदान ठरणार आहे. प्रसिद्धी, पैसा, प्रतिष्ठा, नोकरी आणि यश या सगळ्या गोष्टींचा फायदा 4 राशींना होणार आहे. कुंडलीमध्ये जेवढा सूर्य मजबूत असेल तेवढा जास्त फायदा आहे जाणून घेऊया कोणत्या चार राशींवर चांगला प्रभाव असेल.
वृभष : आर्थिक स्थिती सुधारेल. दुसरीकडे, जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल आहे. गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळेल. परदेशात नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठीही हा काळ अनुकूल आहे.
कन्या : या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. हा एक महिना शुभ असणार आहे. करिअरमध्ये यश मिळेल. पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात पदोन्नतीही अपेक्षित आहे.
सिंह : या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. तुम्हाला मोठा फायदा होईल. समाजात मान-सन्मान मिळेल. तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर ते लवकरच पूर्ण होईल.
तुळ : तुळ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या काळात उत्पन्न वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. संपत्तीतही वाढ होण्याची शक्यता आहे. हा महिना तुमच्यासाठी शुभ असू शकतो.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. अधिक बातम्यांसाठी फॉलो करा 24 Tass.com )