आज चैत्र महिन्यातील सोम प्रदोष व्रताचा अद्भुत योगायोग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि उपासना पद्धत

Som Pradosh Vrat shubh Muhurat: आज सोमवार...म्हणजे भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्याचा दिवस. आज अजून एक शुभ योग जुळून आला आहे. आज चैत्र महिन्यातील सोम प्रदोष व्रतही आहे. अशा या शुभ व्रताबद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती. 

नेहा चौधरी | Updated: Apr 3, 2023, 07:32 PM IST
आज चैत्र महिन्यातील सोम प्रदोष व्रताचा अद्भुत योगायोग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि उपासना पद्धत title=
som pradosh vrat 2023 date time importance muhurat and puja vidhi in marathi

Som Pradosh Vrat 2023 : धार्मिक मानतेनुसार प्रदोष व्रत हे खूप खास असतं. चैत्र महिन्यातील दुसरं प्रदोष व्रत हे अतिशय खास आहे. कारण ते सोमवारी आल्यामुळे ते सोम प्रदोष व्रत असणार आहे. सोमवार (Chaitra Som Pradosh Vrat 2023 Date) हा भगवान शंकराला प्रसन्न करण्याचा दिवस असतो. शिवाची पूजा करण्याचा दिवस आणि प्रदोष व्रत सोमवारी येणं हे एक अद्भुत योगायोग आहे. त्यामुळे आजच्या दिवशी शिवाची मनोभावे पूजा केल्यास तुमची सर्व इच्छा पूर्ण होते असं मान्यता आहे. मग चला तर या व्रताबद्दल जाणून घेऊयात... (som pradosh vrat 2023 date time importance muhurat and puja vidhi in marathi )

चैत्र सोम प्रदोष व्रत 2023 मुहूर्त (Chaitra Som Pradosh Vrat 2023 Muhurat)

आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी सोमवार 03 एप्रिल 2023...म्हणजे आज चैत्र सोम प्रदोष व्रताची तिथी सकाळी  06.24 वाजता सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी 04 एप्रिल 2023 ला सकाळी 08.05 वाजेपर्यंत असणार आहे. 

शिवपूजेचा शुभ मुहूर्त - संध्याकाळी 06:40 - रात्री 08:58 वाजेपर्यंत

सोम प्रदोष व्रत महत्त्व (Som Pradosh Vrat Significance)

धार्मिक मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की, सोम प्रदोष व्रत केल्यास दोन गायी दान केल्यानंतर जे फळ मिळतं ते या व्रताने मिळतं. आयुष्यातील सर्व संकट दूर करण्यासाठी सोम प्रदोष व्रताला मनोभावे शिव भगवानची पूजा केली पाहिजे.

या लोकांनी हे व्रत नक्की करा!

ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र दोष आहे त्यांनी हे सोम प्रदोष व्रत नक्की केलं पाहिजे. हे व्रत केल्यामुळे कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते. शिवाय आयुष्यातील मानसिक तणाव नाहीसा होतो. 

सोम प्रदोष व्रताची उपासना पद्धत  (Som Pradosh Vrat puja vidhi)

  • सोम प्रदोष व्रतामध्ये प्रदोष काल म्हणजेच संध्याकाळची वेळ शुभ चांगली मानली जाते. 
  • त्यामुळे सूर्यास्ताच्या एक तास आधी आंघोळ करुन शुभ मुहूर्तावर पूजा करा. 
  • शिवलिंगाला गायीचं दूध, दही, तूप, मध आणि गंगेच्या पाण्याने अभिषेक करा. 
  • त्यानंतर शिवलिंगावर पांढरे चंदन लावून बेलपत्र, मदार, फुले, भांग इत्यादी अर्पण करा. 
  • शिवलिंगावर चांदी, तांब्याच्या भांड्यातून शुद्ध मध प्रवाहाच्या रूपात अर्पण करा.
  • यानंतर ॐ सर्व सिद्ध प्रदाये नमः मंत्राचा  108 वेळा जप करत शिवलिंगाला अभिषेक करा.
  • महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.
  • यानंतर विधिनुसार पूजा करून आरती करा.  

'या' चुका करू नका (Som Pradosh Vrat Rules)

  • प्रदोष व्रताच्या दिवशी पूजेत काळे कपडे घालू नका. 
  • चुकूनही वडिलांचा आणि शिक्षकाचा अनादर करू नका.
  • महिलांसाठी कोणत्याही प्रकारचे हिंसाचार, अपमानास्पद शब्द वापरू नका. 
  • शिवाची पूजा करायची जागा स्वच्छ ठेवा. 
  • घरात शांततेचे वातावरण ठेवा.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)