December Gochar 2022: शुक्र ग्रह दोनदा करणार राशी परिवर्तन, या राशींना मिळणार लाभ

Shukra Rashi Parivartan 2022: शुक्र ग्रह सध्या वृश्चिक राशीत असून डिसेंबर महिन्यात दोनदा राशी परिवर्तन करणार आहे. पहिल्यांदा धनु आणि त्यानंतर मकर राशीत असणार आहे. त्यामुळे चार राशींना चांगलं फळ मिळणार आहे. 

Updated: Nov 22, 2022, 12:34 PM IST
December Gochar 2022: शुक्र ग्रह दोनदा करणार राशी परिवर्तन, या राशींना मिळणार लाभ title=

Shukra Gochar 2022: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं महत्त्व आहे. शुक्राला लाभदाता ग्रह म्हणून संबोधलं जातं. शुक्र (Shukra Grah) हा जोडीदार, प्रेम, विवाह, समृद्धी, सुख, वाहन, कला, नृत्य, संगीत यांचा प्रतीक आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्राला असुरांचा गुरु मानलं गेलं आहे. असं असलं तरी शुक्र हा शुभ ग्रह मानला जातो. नोव्हेंबर महिना संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. शुक्र डिसेंबर महिन्यात धनु (Dhanu) आणि त्यानंतर मकर (Makar) राशीत प्रवेश करणार आहे. 5 डिसेंबरला धनु राशीत (Shukra Dhanu Gochar) आणि 29 डिसेंबरला मकर राशीत प्रवेश (Shukra Makar Gochar) करणार आहे. या ज्योतिषीय घडामोडींमुळे 12 राशींवर शुभ-अशुभ परिणाम होणार आहे. मात्र चार राशींसाठी ही स्थिती अनुकूल असणार आहे. चला जाणून घेऊयात या चार राशी कोणत्या आहेत. 

धनु (Dhanu)- डिसेंबर महिन्यातील शुक्र गोचर या राशीसाठी लाभदायी ठरणार आहे. या महिन्यात दोनदा गोचर करणार आहे. 5 डिसेंबरला शुक्र धनु राशीत असणार आहे. त्यामुळे ही स्थिती लाभदायी ठरणार आहे. या काळात उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. तसेच आर्थिक स्थिती देखील काळात सुधारेल. विदेश यात्रा करण्याचा योगही जुळून येईल. 

कुंभ (Kumbh)- या राशीसाठी शुक्र गोचर फलदायी ठरेल. शुक्राचा गोचर या राशीच्या गोचर कुंडलीत 11 व्या स्थानात होणार आहे. या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचं स्थान म्हंटलं जातं. यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच खर्च कमी होऊन बचत वाढेल. या काळात नशिबाची देखील साथ मिळेल. या काळात केलेली गुंतवणूक फळेल. 

वृश्चिक (Vrushchik)- या राशीसाठी डिसेंबर महिना आनंददायी जाईल. शुक्र या राशीच्या दुसऱ्या स्थानात प्रवेश करणार आहे. या स्थानाला वाणी आणि धनाचं स्थान मानलं जातं. यामुळे अचानक पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. अडकलेली कामंही या काळात पूर्ण होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. 

बातमी वाचा- Guru Margi 2022: 24 नोव्हेंबरला गुरू होणार मार्गस्थ, या राशींना होणार फायदा

सिंह (Sinha)- ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र गोचर या राशीसाठी लाभदायी असणार आहे. या राशीच्या गोचर कुंडलीतील पंचम स्थानात शुक्र गोचर करणार आहे. संतान, उच्च शिक्षण आणि प्रेम संबंध यांच्याशी निगडीत हे स्थान आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ यश देणारा आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)