Shukra Gochar 2023 : शुक्र गोचर 'या' राशींचं भाग्य चमकवणार, Promotion - Increment पक्का

Shukra Gochar 2023  : मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. हा महिना प्रत्येक नोकरदार वर्गासाठी महत्त्वाचा असतो. कारण वर्षभर केलेल्या मेहनतीचं फळ त्यांना मिळणार असतं. या महिन्यात धन आणि समृद्धीची देवता शुक्रचं गोचर (Venus Transit Change) होणार आहे. मग जाणून घ्या तुमच्या नशीबात प्रमोशन - इंक्रीमेंट (Promotion - Increment ) आहे का ते?

Updated: Mar 1, 2023, 06:46 AM IST
Shukra Gochar 2023 : शुक्र गोचर 'या' राशींचं भाग्य चमकवणार, Promotion - Increment पक्का title=
Shukra Gochar 2023 Venus Transit Change these zodiac sign confirmed promotion increment and salary increase in marathi

Venus Transit Change 2023 Zodiac Signs in marathi :  मार्च म्हणजे प्रमोशन आणि इंक्रीमेंटचा महिना...प्रत्येक नोकरदाराला चिंता सतवते की यंदा आपलं प्रमोशन आणि इंक्रीमेट होणार की नाही. झालं तर किती होणार...तर ज्योतिषशास्त्रानुसार मार्च महिना या काही राशींच्या लोकांसाठी धनलाभ घेऊन आला आहे. कारण या महिन्यात शुक्राचं गोचर (Shukra Gochar 2023 ) होणार आहे. शुक्राचं संक्रमण 12 मार्च 2023 ला सकाळी 8.12 वाजता होणार आहे. त्यामुळे हे संक्रमण काही राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. या राशीच्या लोकांचं नशीब चमकणार आहे. शुक्र हा धन आणि समृद्धीचा देवता असल्याने तीन राशीच्या लोकांसाठी तो भाग्यशाली ठरणार आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या तीन नशीबवान राशी...(Shukra Gochar 2023 Venus Transit Change these zodiac sign confirmed promotion increment and salary increase in marathi )

'या' राशींचं भाग्य चमकणार!

मिथुन  (Gemini)

या राशीच्या लोकांचा सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. जमिनीच्या व्यवहारातून त्यांना धनलाभ होणार आहे. नोकरदार वर्गासाठी शुक्र गोचर बढती घेऊन येणार आहे. या राशीच्या लोकांना गोड बातमी मिळणार आहे. त्यांचा घरी पाळणा हलणार आहे. तर या राशीच्या विद्यार्थ्यांना यश प्राप्त होणार आहे. 

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी शुक्र गोचर सगळ्यात जास्त भाग्यवान ठरणार आहे. नोकदारवर्गासाठी आनंदाच आनंद असणार आहे. कारण त्याची पदोन्नती आणि पगारवाढ होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. लांब प्रवास आणि नवीन नोकरीचीही संधी चालून येणार आहे. 

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांची घवघशीत पगारवाढ आणि बढतीदेखील होणार आहे. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण असणार आहे. मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा उत्तम काळ आहे. 
या महिन्यात आनंद आणि ऐशोआरामासाठी खर्च होण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)