Shardiya Navratri 2022: नवरात्रीसाठी घराची साफसफाई करताय का? मग ही बातमी वाचा

आज आम्ही तुम्हाला लाकडी मंदिर साफ कसे करायचे याविषयी काही टिप्स सांगणार आहोत. 

Updated: Sep 24, 2022, 02:13 PM IST
Shardiya Navratri 2022: नवरात्रीसाठी घराची साफसफाई करताय का? मग ही बातमी वाचा  title=
Shardiya Navratri 2022 Cleaning the house for Navratri NZ

Temple Cleaning Tips: शारदीय नवरात्री हा सण भारतात खूप जल्लोषात साजरा केला जातो. या वर्षी शारदीय नवरात्री (Shardhiy Navaratri)  हा सण 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत साजरी केली जाईल. या 9 दिवसांमध्ये देवीची आराधना, पूजा आणि उपवास (Fast) केले जातात. पण या 9 दिवसांमध्ये देवीच्या मंदिराची साफसफाई असणे देखील गरजेचे आहे. 

देवी त्याच घरात किंवा मंदिरात वास करते जिथे साफसफाई असेल. अनेक लोकांच्या घरात लाकडाचे मंदिर असते. मग अशावेळेस साफसफाई करणे थोडे कठीण होऊन जाते. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला लाकडी मंदिर साफ कसे करायचे याविषयी काही टिप्स सांगणार आहोत. (Shardiya Navratri 2022 Cleaning the house for Navratri NZ)

1. बेकिंग सोडाचा वापर करा

अनेकदा पूजा करताना मंदिरात गुलाल किंवा चंदनाचे डाग दिसतात मग हे डाग जाता जात नाही. अशावेळेस तुम्ही बेकिंग सोडाचा वापर करु शकता. 2 कप पाण्यात 1 चमचा बेकिंग सोडा मिक्स करुन घ्या. ज्या ठिकाणी मंदिरात डाग आहेत त्या ठिकाणी 5 ते 10 मिनिटांसाठी ते मिश्रण तिथे ठेवा. काही  वेळेनंतर क्लीनिंग ब्रश आणि कॉटनचा वापर करुन ते डाग काढा. 

आणखी वाचा... Navratri Festival 2022 : यंदा नवरात्रीचे खास वैशिष्ट्य काय आहे?, नऊ रंगही जाणून घ्या

2. व्हिनेगर चा करा वापर

मंदिरात दिवा लावण्यासाठी तूप किंवा तेलाचा वापर करतो. पण काहीवेळेस त्याचे डाग तसेच राहतात. त्यांना साफ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा वापर करु शकता. त्यासाठी एका स्प्रे बॉटल मध्ये पानी भरुन 2 चमचे व्हिनेगर मिक्स करा. मंदितात जिथे डाग आहेत तिथे त्या स्प्रेचा वापर करुन ते डाग कॉटन किंवा सूती कपड्याने साफ करुन घ्या. 

3. बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस 

मंदिर साफ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस याचा वापर करु शकता. त्यासाठी एका वाटीत 1 चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा लिंबाचा रस मिक्स करुन घ्या. हे मिश्रण डाग असलेल्या जागेवर वापरा आणि ते डाग कॉटनच्या मदतीने साफ करुन घ्या.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा... नवरात्रीचा उपवास करताय! काय खावं, काय टाळावं... वाचा तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं