मुंबई : आपल्या जीवनात नवग्रहांचं खूप महत्त्व आहे. ज्योतिषांच्या मते, ग्रहांची हालचाल आणि स्थिती हा आपल्या जीवनात घडणाऱ्या क्रियांचा मुख्य घटक असतो. कुंडलीतील ग्रहांची प्रतिकूल स्थिती ग्रह दोषांना जन्म देते. ग्रह दोषांमुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. सध्या सुरू असलेली कामंही कोणत्या ना कोणत्या कारणाने ठप्प होतात. अशा स्थितीत ग्रह दोष दूर करणं अत्यंत आवश्यक आहे. ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी शास्त्रात काही खास उपाय सांगण्यात आले आहेत ते जाणून घेऊया.
ज्योतिषांच्या मते, राहू-केतूला कुंडलीत छाया ग्रह म्हणतात. राहु दोषामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक अडथळे येतात. कष्ट करूनही यश मिळत नाही. घरातील सदस्यांमध्ये तणावाचं वातावरण राहील. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. राहु दोष शास्त्राच्या उपायांनी दूर करता येऊ शकतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)