Shani Vakri 2023 : शनीची उल्टी चाल 'या' राशींसाठी ठरणार लाभदायक; धनलाभ होण्याची शक्यता!

Shani Vakri 2023 Effects : 17 जून रोजी शनिदेव स्वराशी कुंभ राशीत वक्री झालेत. वक्री शनि जरी अशुभ मानला जात असलं तरी काही राशींसाठी तो फलदायीही ठरू शकतो. जाणून घेऊया याचा सकारात्मक परिणाम कोणत्या राशींवर होणार आहे. 

Updated: Jun 29, 2023, 06:12 PM IST
Shani Vakri 2023 : शनीची उल्टी चाल 'या' राशींसाठी ठरणार लाभदायक; धनलाभ होण्याची शक्यता! title=

Shani Vakri 2023 Effects : शनिदेव हे कर्माचे देवता मानले जातात. ज्या राशींवर शनिदेवाची कृपा असते त्यांना जीवनाच्या प्रत्येक कामात लाभ होतो. 17 जून रोजी शनिदेव स्वराशी कुंभ राशीत वक्री झालेत. दरम्यान नोव्हेंबर महिन्यापर्यंत या स्थितीत राहणार आहे. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, शनि वक्रीचा सर्व राशींवर प्रभाव पडणार आहे. वक्री शनि जरी अशुभ मानला जात असलं तरी काही राशींसाठी तो फलदायीही ठरू शकतो.

शनी वक्री झाल्यानंतर 4 नोव्हेंबर दुपारी 12.30 वाजेपर्यंत या स्थितीत राहणार आहे. शनी देव जवळपास 140 दिवस विविध राशींना परिणाम देणार आहे. जाणून घेऊया याचा सकारात्मक परिणाम कोणत्या राशींवर होणार आहे. 

मेष रास

मेष राशीच्या लोकांना संयमाने काम करावं लागणार आहे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे. तुम्हाला यावेळी नव्या आणि चांगल्या नोकरीची ऑफर मिळणार आहे. परदेशात जाण्याचीही शक्यता निर्माण होतेय.  हातातील कामं प्रलंबित ठेऊ नका. तुमचं काम चोख ठेवा आणि तुमच्या अधिकाऱ्यांशी संवाद ठेवा. जोडीदाराच्या शोधात असलेल्या लोकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. 

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांना मेहनतीचं फळ देणार आहेत. शनिदेव तुमच्या संयमाची परीक्षा घेत असतील. परीक्षा उत्तीर्ण होताच त्याला मोठा निकाल मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं वरिष्ठांकडून कौतुक होणार आहे. या काळात कार्यक्षेत्र आणि व्यवसायात लाभ होण्याची चिन्ह आहेत. तसंच यावेळी तुम्हाला भरपूर पैसै मिळू शकतात. बिझनेसमध्ये यापूर्वी नुकसान झालं असेल तर ते भरून निघण्याची शक्यता आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांनी आळशीपणाला कोणत्याही प्रकारे वरचढ होऊ देऊ नये. येत्या काळात शनि वक्री तुमच्या मेहनतीचे फळ देणार आहे. कार्यालयात गोपनीय कागदपत्रे ठेवतात त्यांनी त्यांची सुरक्षा वाढवली पाहिजे. महत्त्वाची कागदपत्रे, फाइल्स, हार्ड डिस्क, पेनड्राइव्ह बाबतीत डेटा सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. बरेच दिवस रखडलेली कामं पूर्ण होऊ होणार आहे. विद्यार्थ्यांना करियरमध्ये चांगली संधी मिळणार आहे. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )