Shani Margi 2023 : 'या' दिवशी शनि मार्गी होणार?, या राशींच्या लोकांना मोठा फायदा

Shani Margi Date :  शनिदेवाच्या शुभ प्रभावामुळे माणसाच्या जीवनात मोठे आणि चांगले बदल दिसून येतात. त्यामुळे शनि मार्गी होणार असल्याने अनेकांच्या जीवनात आनंद येणार आहे. शनीला न्याय देणारा आणि कर्म देणारा देखील म्हटले जाते.  

Updated: Jun 29, 2023, 12:51 PM IST
Shani Margi 2023 : 'या' दिवशी शनि मार्गी होणार?, या राशींच्या लोकांना मोठा फायदा   title=
Shani Margi 2023

Shani Margi Date : शनि मार्गीचा मोठा योग आहे. जेव्हा एखादा ग्रह राशीत असताना सरळ फिरतो तेव्हा त्याला मार्गी म्हणतात. शनी सध्या  वक्री आहे आणि 4 नोव्हेंबर रोजी गोचर होईल. शनि मार्गी  होत असल्यामुळे अनेक लोकांसाठी चांगला काळ येणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना खूप मोठा लाभ होणार आहे. 

ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला महत्त्वाचा ग्रह मानले जाते. हा सर्वात संथ चालणारा ग्रह आहे आणि सुमारे अडीच वर्षे राशीत राहतो. शनिदेवाच्या शुभ प्रभावामुळे माणसाच्या जीवनात मोठे आणि चांगले बदल दिसून येतात. त्यामुळे शनि मार्गी होणार असल्याने अनेकांच्या जीवनात आनंद येणार आहे. शनीला न्याय देणारा आणि कर्म देणारा देखील म्हटले जाते. जो प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार चांगले आणि वाईट फळ देत असतो. सध्या शनिदेव आपल्या गोचर अवस्थेत वावरत आहेत. याला शनीची उलटी चाल असेही म्हणतात.

जेव्हा शनिदेव सरळ दिशेने चालू लागतात तेव्हा तो शनि मार्गी असल्याचे म्हटले जाते. 17 जून 2023 रोजी शनि वक्री होता आणि आता 4 नोव्हेंबर 2023 रोजी शनिवारी मार्गी होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनीच्या उलट हालचालीचा राशींवर दुष्परिणाम होतो. या दरम्यान त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दुसरीकडे, शनि मार्गात असताना, राशींचे बंद झालेले भाग्य उजळते. काही राशींना शनि मार्गीचा मोठा लाभ मिळणार आहे.

वृषभ - वृषभ राशीच्या लोकांना  शनीच्या मार्गीमुळे खूप फायदा होणार आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. व्यवसायातही फायदा होईल. या काळात चांगली नोकरी मिळण्याचीही चिन्हे आहेत. उच्च शिक्षण मिळण्याची शक्यता आहे. शनि तुम्हाला मार्गी राहून तुमच्या मेहनतीचे फळ देईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.

मिथुन - शनीच्या मार्गीमुळे  मिथुन राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. या दरम्यान शनि तुम्हाला कठोर परिश्रम करायला लावेल, पण पूर्ण फळही देईल. वडील आणि वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. व्यवसायाशी निगडित लोकांसाठी शनीचा मार्गीने चांगला परिणाम होईल. 

तूळ - तूळ राशीच्या लोकांना करिअरमध्ये खूप चांगले परिणाम मिळतील. कामाचे वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. काही लोकांना प्रमोशन देखील मिळू शकते. व्यावसायिकांना मोठा लाभ होईल. तुमची आर्थिक स्थित सुधारण्यास मदत होईल.

धनु - शनीच्या मार्गीमुळे धनु राशीच्या लोकांना खूप लाभ होणार आहे. या काळात तुमची अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होतील. व्यवसायात वाढ होईल. नोकरदारांना प्रगतीची शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला काही मोठी जबाबदारी मिळू शकते, जी तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. शनिची थेट चाल विद्यार्थ्यांसाठीही खूप चांगली असणार आहे. शिक्षणात अनुकूल परिणाम मिळतील. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)