शनी वक्री दृष्टीपासून विघ्नहर्ता गणरायाही सुटू शकले नाहीत, ही गोष्ट तुम्हाला माहितीयं?

Shani Ganesh Story : गणरायाला हा विघ्नहर्ता आहे, कारण तो सर्वांचं विघ्न दूर करतो. पण तुम्हाला माहिती आहे का शनिदेवाच्या वक्री दृष्टीपासून गणरायालाही बाधीत झाले. गणरायाचं शीरही धडापासून वेगळं झालं होतं.  

नेहा चौधरी | Updated: Jul 24, 2023, 11:07 AM IST
 शनी वक्री दृष्टीपासून विघ्नहर्ता गणरायाही सुटू शकले नाहीत, ही गोष्ट तुम्हाला माहितीयं? title=
shani vakra drishti lord ganesha elephant head story in marathi

Shani Ganesh Story : हिंदू धर्मात कुठलंही शुभ कामं सुरु करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. असं म्हणतात की, आपल्या भक्तांचे सर्व संकट गणराया दूर करतो. म्हणून त्याला विघ्नहर्ता असं म्हणतात. तर दुसरीकडे शनिदेव हा न्याय आणि दंडाधिकारी म्हणून ओळखला जातो. कारण शनिदेव कर्मानुसार तो जाचकाला फळं देतो. तुमचे कर्म चांगले असतील तर चांगले फळं मिळतात. तर वाईट कर्म करणाऱ्याला शनीदेव शिक्षा देतो. म्हणून अनेकांना शनिदेवाची भीती वाटते. न्यायदेवतीचं काम शनिदेवाला खुद्द भगवान भोलेनाथांननी वरदान दिलं आहे. (shani vakra drishti lord ganesha elephant head story in marathi )

पौराणिक कथेमध्ये गणराया आणि शनिदेव यांच्याशी संबंधित अनेक धार्मिक कथा आहेत. त्यातील एक कथा अशी आहे ज्यात शनिदेवाच्या वक्री दृष्टीच्या प्रहारापासून बालगणेशही प्रभावित झाले होते. चला आज आपण श्रावण अधिक मासात गणेश आणि शनिदेवाची या कथेबद्दल जाणून घेऊयात. 

गणेशाचा जन्म 

पुराणानुसार, जेव्हा माता पार्वतीने गणरायाला जन्म दिला. त्यावेळी भगवान भोलेनाथ आणि माता गौरी यांनी गणेशाच्या जन्मोत्सव आयोजित केला होता. त्यावेळी बालगणेशाला आशीवार्द देण्यासाठी सर्व देवी देवता कैलासवर आले होते. या सोहळ्यासाठी शनिदेवही आले होते. पण त्यांनी बालगणेशाला आशीर्वाद दिला नाही, हे तुम्हाला माहिती आहे का? उलट यावेळी शनीदेव मान खाली घालून उभे होते. 

शनिदेव का पाहत नव्हते बालगणेशाकडे?

तेव्हा माता पार्वतीने पाहिले की शनिदेव आपल्या मुलाकडे पाहत देखील नाहीत तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं. त्यावेळी माता पार्वतीने शनिदेवाला विचारलं की, ''तुम्ही असं नतमस्तक होऊन का उभे आहेत आणि बालगणेशाकडे का पाहत नाही आहात?'' त्यावेळ शनिदेव म्हणाली की, ''माता..! मला असं वाटतं मी तुमच्या मुलाकडे पाहिलं तर त्याचं नुकसान होऊ शकतं.'' 

माता पार्वतीला शनिदेवाच्या वक्री दृष्टीबद्दल कल्पना नव्हती. त्यावेळी शनिदेवाने माता पार्वतीला आपल्या शापाबद्दल सांगितले. 

जेव्हा शनिदेवाची वक्री दृष्टी गणेशावर पडली...

पण माता पार्वती म्हणाल्या की, माझ्या मुलाला सर्व देव देवतांचं आशीर्वाद मिळाला आहे. त्यांचं काही वाईट होणार नाही. त्यामुळे पार्वतीने शनिदेवाला गणेशाचे दर्शन घेण्याचे आग्रह केला. त्यामुळे माता पार्वती नाराज होईल म्हणून शनिदेवाने बालगणेशाचं दर्शन घेण्याचं ठरवलं. जसं शनिदेवाने बालगणेशाकडे पाहिलं तसंच गणरायाचं शीर धडापासून वेगळं झालं आणि आकाशात उडून गेलं. हे पाहून माता पार्वती बेशुद्ध पडल्या. 

अशी मिळाली बालगणेशाला नवसंजीवनी 

या घटनेनंतर भगवान विष्णू आपल्या वाहन गरुडावर निघून गेले. त्यांना उत्तरेकडे  पुष्पभद्रा नदीच्या काठी हत्तीणीचा बालक दिसला. त्यावेळी हत्तीणी आपल्या नवजात बाळाला घेऊन उत्तर दिशेला तोंड करुन झोपली होती. त्यावेळी विष्णूजींनी आपल्या सुदर्शन चक्राने नवजात गजशिशुचे शीर कापून ते कैसालावर नेले. अशा प्रकारे बालगणेशाला गजशिशुचे मस्तक लावण्यात आले आणि गणेशाला पुन्हा जीवनदान मिळाले. 

हेसुद्धा वाचा - Shani Rahu Yuti 2023: शनि राहूच्या अशुभ योगात 'या' राशींनी राहवं सतर्क, 17 ऑक्टोबरनंतर येणार अच्छे दिन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)