Shani Surya Yuti 2024 : प्रत्येकाला उत्सुकता असते की, आपल्या भविष्यात काय घडणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्र यात आपल्याला मदत करते. येणार नवीन वर्ष 2024 ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून कसं असेल त्याबद्दल सांगितलं आहे. नवीन वर्षात ग्रहांचा राजा सूर्यदेव आणि न्यायदेवता शनिदेव यांची युती येणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हे दोन ग्रह एकमेकांचे शत्रू म्हणून ओळखले जातात. अशावेळी या दोन शत्रूंची युती ही काही राशींच्या आयुष्यात वादळ आणणार आहे. या राशींच्या लोकांना आर्थिक हानीसह अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. एवढंच नाही तर त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार असंही ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांचा इशारा आहे. (Shani Surya Yuti Enemy planets Sun and Saturn alliance in 2024 Increase in the problem of these zodiac people health effects including loss of wealth)
शनि आणि सूर्याचा संयोगामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी घातक ठरणार आहे. हा संयोग या राशीच्या आठव्या घरात निर्माण होतो आहे. त्यामुळे तुम्हाला छुप्या आजार गाठणार आहे. विवाहिक जीवनात वादळ येणार आहे. त्याशिवाय या काळात कोणतेही नवीन काम करणं टाळा. करिअर आणि व्यवसायात कोणतेही नवीन बदल करण्याचा विचार करु नका. नवीन गुंतवणुकीतून तुम्हाला फटका बसणार आहे. शनीचा प्रभाव तुमच्यासाठी वाईट ठरणार आहे. या काळात तुम्ही आरोग्याची काळजी नक्की घ्या.
शनि आणि सूर्याचा संयोग तुमच्यासाठी वाईट काळ घेऊन आला आहे. हा संयोग तुमच्या राशीतून 12व्या घरात निर्माण होतो आहे. त्यामुळे अनावश्यक खर्चाचा बोझा वाढणार आहे. तुमच्यावर कर्जाचं डोंगळ असणार आहे. तुमच्यावर काही खोटे आरोप होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही तणावग्रस्त असणार आहात. व्यावसायात तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. तुमचं आर्थिक नुकसान होणार आहे. या काळात कोणालाही पैसे उधार देणं टाळा. शनीची साडेसाती तुमच्यासाठी घातक ठरणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.
शनि आणि सूर्याचा संयोग तुमच्यासाठी हानिकारक ठरणार आहे. योगायोग तुमच्या राशीच्या सहाव्या घरात निर्माण होणार आहे. तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये अपयशाला सामोरे जावं लागणार आहे. आरोग्याची समस्या डोकेदुखी ठरणार आहे. अपघात किंवा दुखापतीची शक्यता आहे. वाहन या काळात जपून वापरा. काम आणि व्यवसायात अधिक लक्ष घाला अन्यथा मोठ्या संकटाला निमंत्रण द्याल. या काळात कोणतीही नवीन गुंतवणूक करणं टाळा.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)