Shani and Shukra Gochar: शनि-शुक्र षडाष्टक योग, 24 दिवस 'या' राशींनी जरा सांभाळूनच

शनि आणि शुक्र मिळून षडाष्टक योग तयार होईल. षडाष्टक योग म्हणजे शुक्र शनिपासून अष्टक होईल. शुक्र शनिपासून सहा घरांच्या अंतरावर असेल

Updated: Jul 21, 2022, 03:33 PM IST
Shani and Shukra Gochar: शनि-शुक्र षडाष्टक योग, 24 दिवस 'या' राशींनी जरा सांभाळूनच title=

Shani Shukra Make Shadashtak Yog: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला महत्त्व असून ठरावीक कालावधीनंतर गोचर करत असतात. कधी कधी एकापेक्षा जास्त ग्रह एकाच राशीत येतात तेव्हा काही शुभ-अशुभ योग तयार होतात. तर काही ग्रह विरोधाभासी राशीत आल्याने त्याप्रमाणे फळं मिळतात. शनि ग्रह सध्या मकर राशीत वक्री अवस्थेत आहे. दुसरीकडे, शुक्र ग्रह कर्क राशीत आहे. 31 ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह कर्क राशी सोडून सिंह राशीत प्रवेश करेल. यामुळे शनि आणि शुक्र मिळून षडाष्टक योग तयार होईल. षडाष्टक योग म्हणजे शुक्र शनिपासून अष्टक होईल. शुक्र शनिपासून सहा घरांच्या अंतरावर असेल. 24 सप्टेंबरपर्यंत शुक्र या स्थितीत राहील. 

पंडित शशिशेखर त्रिपाठी यांच्यानुसार कोणत्याही ग्रहाचा षडाष्टक योग शुभ मानला जात नाही.  1 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर 2022 पर्यंत शनी-शुक्र षडाष्टक योग तयार करतील. या काळात 4 राशीच्या लोकांना खूप सावध राहावे लागेल. शनि आणि शुक्राचा षडाष्टक योग शुभ म्हणता येत नाही आणि या काळात विशेषत: चार राशी असलेल्यांनी खूप सावध राहावे लागेल. चला जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी षडाष्टक योग अशुभ सिद्ध होऊ शकतो.

4 राशीच्या लोकांनी 24 दिवस काळजी घ्यावी

वृषभ: षडाष्टक योग वृषभ राशीच्या लोकांसाठी  अडचणीचा ठरू शकतो. या लोकांनी या काळात आळस टाळावा अन्यथा त्यांना करिअरमध्ये अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

मिथुन: षडाष्टक योग मिथुन राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्या देऊ शकतो. त्यांनी अपघाताबाबतही दक्षता घ्यावी. वाहन चालवताना काळजी घ्या. याशिवाय मधुमेही रुग्णांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. रोज चालण्याचा व्यायाम करावा.

धनु: शनी-शुक्राचा षडाष्टक योग धनु राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये अडचणीचा ठरेल. कटू बोलण्यामुळे नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुम्ही जितके नम्र असाल तितके चांगले. व्यापाऱ्यांनीही हे लक्षात ठेवावे. कौटुंबिक मालमत्तेबाबत वाद होऊ शकतो. 

कुंभ: षडाष्टक योगामुळे वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. विशेषत: जे लोक दौऱ्यावर असतात, ते आपल्या जोडीदाराला वेळ देऊ शकत नाहीत आणि यामुळे मोठी समस्या उद्भवू शकते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)