Shani Jayanti 2024 : शनि जयंती सिंह राशीसह 'या' लोकांसाठी अशुभ! करिअर आणि प्रेम जीवनात मोठ्या अडचणी?

Shani Jayanti 2024 : न्यायदेवता आणि कर्मदाता शनिदेव यांची जयंती येत्या 6 जून 2024 ला असणार आहे. शनि जयंतीच्या दिवशी राहू आणि शनि यांच्या भेटीतून द्वादश योग निर्माण होणार आहे. या योग काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे.   

नेहा चौधरी | Updated: May 30, 2024, 02:45 PM IST
Shani Jayanti 2024 : शनि जयंती सिंह राशीसह 'या' लोकांसाठी अशुभ! करिअर आणि प्रेम जीवनात मोठ्या अडचणी? title=
Shani Jayanti these zodiac sign negative impact face issues in finances and trouble in love life

Shani Jayanti 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांमधील कर्मदाता आणि न्यायदेवता सूर्यपूत्र शनिदेवाची प्रत्येकाला भीती वाटते. कारण शनिदेव हा जाचकाला त्याच्या कर्माची शिक्षा देतो. अगदी शनिदेवाची पूजा करताना अनेक नियम सांगण्यात आले आहे. तुमची एक चूक शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना तुम्हाला करावा लागतो. अशात येत्या जून महिन्यात 6 जूनला शनि जयंती असणार आहे. यादिवशी शनि आणि राहूच्या मिलनातून अशुभ असा द्वादश योग निर्माण होणार आहे. त्यात 1 जूनला मंगळ मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे शनि जयंती काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे. (Shani Jayanti these zodiac sign negative impact face issues in finances and trouble in love life)

मेष रास (Aries Zodiac)  

या राशीच्या लोकांनी कोणताही निर्णय घेतना सावधगिरी बाळगावी. खास करुन पैशाच्या व्यवहाराशी संबंधित निर्णय घेणे टाळा. गुंतवणुकीच्या बाबतीतही काळजीपूर्वक गोष्टी हाताळा. या काळात मेष राशीच्या लोकांनी वाहन चालवताना काळजी घ्यावी. 

कर्क रास (Cancer Zodiac)   

या राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रतिकूल नसणार आहे. या काळात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. कर्क राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव असल्याने शनि जयंती नकारात्मक ठरणार आहे. या काळात तुम्हाला अनेक कौटुंबिक निर्णय घेताना त्रास होईल. विशेषत: आईची तब्येत या दिवसांमध्ये खालवणार आहे. 

सिंह रास (Leo Zodiac) 

या राशीच्या लोकांनी सध्या व्यवसाय नवीन योजना तयार करु नयेत. शनीच्या प्रतिकूल प्रभावामुळे कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळा. वैवाहिक जीवनात काही अडचणी येण्याची शक्यता आहे. आपण नवीन व्यवसाय सुरू करणे टाळा. त्याच वेळी, नोकरदारांनी देखील आत्ताच नोकरी बदलण्याचा निर्णय घेऊन नका. 

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)   

या राशीच्या लोकांनी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करु नका. आर्थिक बाबतीत हा काळ चांगला नसणार आहे. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकतं. त्यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कुटुंबातील काही वादामुळे तुम्हाला दु:खी करणार आहेत. 

मीन रास (Pisces Zodiac)  

या राशीच्या लोकांसाठी हा काळ अशुभ असणार आहे. तुम्हाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. डोकेदुखी, मायग्रेन यासारख्या समस्यांमुळे, गोंधळामुळे तुम्ही निर्णय घेणं टाळा. मन विचलित होणार आहे. राग आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. या काळात कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)