Shani Jayanti 2024 : शनिदेवाच नाव घेतल्यावर भल्या भल्या व्यक्तीला भीती वाटतं. शनिदेव हा कर्मदाता आणि न्यायदेवता असल्याने तो जाचकांना त्यांच्या कर्माची शिक्षा देतो. अशात गुरुवारी 6 जूनला शनि जयंती आहे. यादिवशी शनि आणि राहूच्या मिलनातून अशुभ असा द्वादश योग निर्माण होणार आहे. त्यामुळे शनि जयंती ही काही राशींच्या लोकांसाठी धोकादायक ठरणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या.
शनि जयंती या राशीच्या लोकांसाठी घातक ठरणार आहे. या काळात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या घेरणार आहे. या राशीच्या लोकांवर शनिचा प्रभाव असल्याने शनि जयंती नकारात्मक परिणार करणार आहे. या काळात तुम्हाला अनेक कौटुंबिक निर्णयात कठीण प्रसंगातून जावं लागणार आहे. शनि जयंतीला आईची तब्येतकडे विशेष लक्ष द्या.
या राशीच्या लोकांनी शनि जयंतीला कोणताही निर्णय घेताना काळजी घ्यावी. पैशांच्या व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घ्या अन्यथा संकटाचा सामना करावा लागू शकतो. गुंतवणुकीच्या बाबतीतही शनि जयंती अशुभ आहे. या राशीच्या लोकांनी वाहन चालवताना दक्षता घ्यावी.
शनि जयंतीला या राशीच्या लोकांसाठी आर्थिक संबंधित अशुभ असणार आहे. त्या लोकांनी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे टाळा. तुम्हाला रुग्णालयाच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहेत. आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष महागात पडू शकतं. कुटुंबातील काही वादामुळे तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे.
शनि जयंतीला या लोकांनी कोणतेही मोठं निर्णय घेऊ नयेत. वैवाहिक जीवनातही उलथापालथ होण्याची शक्यता आहे. व्यवसायसंदर्भात नवीन योजना आखू नका. नोकरदार लोकांनी आहे ती नोकरी सोडू नये. तर नवीन व्यवसाय सुरु करु नका.
शनि जयंती या राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरणार आहे. तुम्हाला मानसिक त्रासाचा सामना करावा लागणार आहे. डोकेदुखी, मायग्रेन यासारख्या आजाराने तुम्ही त्रस्त असणार आहात. शनि जयंतीला मोठे निर्णय घेणं टाळा. शिवाय राग आणि वाणीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)