Shani 2022: 141 दिवसांपर्यंत मकर राशीत राहणार शनि, कधी मार्गस्थ होणार? जाणून घ्या

प्रत्येक ग्रहाच्या राशी बदलाचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर दिसून येतो. 12 जुलै रोजी शनिने वक्री होत कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश केला आहे

Updated: Jul 13, 2022, 01:49 PM IST
Shani 2022: 141 दिवसांपर्यंत मकर राशीत राहणार शनि, कधी मार्गस्थ होणार? जाणून घ्या title=

Shani Margi In October 2022: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. प्रत्येक ग्रहाच्या राशी बदलाचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर दिसून येतो. 12 जुलै रोजी शनिने वक्री होत कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश केला आहे. या काळात शनिची साडेसाती आणि अडीचकीमुळे प्रभावित झालेल्या राशींना शनि वक्री होताच आराम मिळाला आहे. इतर राशी शनिच्या नियंत्रणाखाली आल्या आहेत. शनि हा अतिशय संथ गतीने मार्गक्रमण करणारा ग्रह आहे आणि त्यामुळेच कोणत्याही राशीवर शनिचा प्रभाव दीर्घकाळ राहतो. 12 जुलैलाच शनि वक्री म्हणजेच उलट दिशेने मार्गस्थ झाला आहे.  शनि ग्रहाने कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश केला आहे. आता शनि येथून कधी मार्गस्थ होणार हे जाणून घेऊया.

पंचागानुसार, 5 जून 2022 रोजी शनि कुंभ राशीतून वक्री झाले होते. या अवस्थेत 12 जुलै 2022 रोजी मकर राशीत प्रवेश केला आहे. या राशीत शनि 141 दिवस राहील. 5 जून ते 22 ऑक्टोबरपर्यंत शनि वक्री स्थितीत राहील. 23 ऑक्टोबरला शनि मार्गस्थ होईल. या दिवशी ज्या राशीच्या लोकांचा शनि अशुभ फल देत आहे, त्यांना शनि मार्गस्थ होताच आराम मिळेल. ज्यांना 5 जून रोजी शनिच्या अशुभ परिणामापासून दिलासा मिळाला आहे. ते पुन्हा एकदा शनिच्या प्रभावाखाली येतील.

12 जुलै रोजी मकर राशीत प्रवेश केल्यानंतर 6 महिने या राशीत राहतील. 23 ऑक्टोबर रोजी मार्गी अवस्थेत आल्यानंतर 17 जानेवारी 2023 रोजी शनि पुन्हा कुंभ राशीत प्रवेश करेल. तेव्हा मकर, कुंभ आणि मीन राशीला साडेसाती सुरु होईल. तर कर्क आणि वृश्चिक राशीला अडीचकी सुरु होईल. या काळात जे लोक शनीच्या नियंत्रणाखाली येतील त्यांनी शनिचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी हे उपाय करावेत.

शनिदेवांचे कृपा मिळवण्याचे उपाय

  • जेव्हा शनि कोणत्याही राशीत प्रवेश करतो तेव्हा काही राशींची शनीची दशा संपते. तर काही राशी शनिच्या प्रभावाखाली येतात. शनिचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
  • शनिदेवाची वाईट नजर टाळण्यासाठी शनिवारी उपवास करा.
  • शनि चालिसाचे पठण विशेष फायदेशीर ठरते.
  • शनिच्या मंत्रांचा जप केल्याने लाभ होतो.
  • शनिवारी काळे तीळ, लोखंड, काळे कपडे इत्यादी शनिशी संबंधित वस्तूंचे दान विशेष लाभदायक ठरते.
  • दुर्बल घटकातील लोकांना शनिदेवाची कृपा मिळण्यासाठी मदत करा. त्यांना कधीही दुखवू नका.
  • गरजूंना मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहा.
  • चुकीचे काम करणाऱ्या लोकांना शनिदेव अशुभ फळ देतात. अशा वेळी चुकीच्या गोष्टींपासून अंतर ठेवा.
  • पशु-पक्ष्यांची सेवा करा. त्यांना धान्य आणि पाणी द्या.यासोबतच गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना मदत केल्याने शनिची कृपाही प्राप्त होते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)