Shani Asta 2023: ज्योतिषशास्त्रात शनिदेवांचं विशेष महत्त्व आहे. न्यायाची भूमिका बजावत असल्याने चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. कारण शनिदेव आपल्या कर्मानुसार फळ देतात. पण शनिदेवांच्या चौकटीत तुमचं कर्म असेल तर शनिदेव जीवन सुखाने भरतात. आर्थिक चणचण दूर करतात. गोचर कुंडलीनुसार शनिदेव 17 जानेवारीला मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. प्रवेश केल्यानंतर 13 दिवसांनी म्हणजेच 30 जानेवारीला अस्ताला जाणार आहे. अस्ताला म्हणजे सूर्याच्या जवळ आल्यानं ग्रहाचं तेज कमी होतं. ही स्थिती पुढचे 28 दिवसांपर्यंत अशीच असणार आहे. त्यानंतर शनिदेव पुन्हा आपल्या तेजासह ग्रहमंडळात दिसतील. अस्त कालावधीत तीन राशींना फायदा होणार आहे. या राशी कोणत्या आहेत पाहुयात
वृषभ- शनिदेव कुंभ राशीत अस्ताला गेल्यानंतर वृषभ राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. नोकरीच्या नव्या संधी या काळात मिळतील. नवीन नोकरी स्वीकारण्यासाठी हा काळ उत्तम आहे. पदोन्नतीसह आर्थिक स्थितीही या काळात सुधारेल. तसेच आखलेल्या योजना या काळात पूर्ण होतील विवाह योग असल्याने लग्न जमतील.
तूळ- शनि ग्रह अस्ताला जाणार असल्याने तूळ राशीच्या लोकांना फायदा मिळेल. या काळात चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक चणचण या काळात दूर होईल. तसेच पैशाचे नवे स्रोत या काळात निर्माण होतील. उत्पन्नात देखील या काळात वाढ होईल. उच्च शिक्षणासाठी धडपड करण्याऱ्यांचा मार्ग मोकळा होईल.
बातमी वाचा- Gemstone: जन्मतारखेवरून परिधान करा तुमचं शुभ रत्न, कसं असतं अंकशास्त्राचं गणित वाचा
मकर- या राशीला साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु असेल. त्यात कुंभ राशीत शनि अस्ताला जाणार असल्याने अचानक पैसे मिळू शकतात. नोकरी आणि पदोन्नतीचा प्रबळ योग जुळून येईल. उद्योगात मोठा करार निश्चित होऊ शकतो. उत्पन्नात वाढ होईल. तसेच जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. ग्लॅमर आणि संवाद क्षेत्रातील लोकांना विशेष लाभ मिळेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)