शनीमुळे चमकणार या 6 राशींचं भाग्य, 'राज योग' ते धनलाभाचेही संकेत

ज्योतिष शास्त्रानुसार शनी ग्रह खरं तर चांगला नाही असं म्हटलं जातं. मात्र हा शनी आता 6 राशींसाठी राज योग ठरू शकतो.

Updated: Feb 24, 2022, 05:14 PM IST
शनीमुळे चमकणार या 6 राशींचं भाग्य, 'राज योग' ते धनलाभाचेही संकेत  title=

मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार शनी ग्रह खरं तर चांगला नाही असं म्हटलं जातं. मात्र हा शनी आता 6 राशींसाठी राज योग ठरू शकतो. 12 राशींपैकी कोणत्या 6 राशी आहेत ज्यांना हा फायदा होणार आहे जाणून घेऊया. 

मेष - या राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये राजयोग आहे. राजकारणात मोठं यश मिळणार आहे. चांगलं पद मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. 

वृषभ - या राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये राजयोग आहे. नोकरी आणि व्यापारामध्ये मोठा फायदा होणार आहे. प्रत्येक कामात यशस्वी होणार आहे. धनलाभाचा योग आहे.

कर्क - हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. धनलाभ होण्याचे संकेत आहेत. प्रेम आणि वैवाहिक जीवनात चांगला आनंद मिळेल. 

तुला- आर्थिक लाभ होणार आहे. पैशांच्या समस्या सगळ्या दूर होणार आहेत. कामाच्या ठिकाणी नशीब आपलं साथ देणार आहे. 

मकर- या राशीच्या लोकांसाठी शनी खूप शुभ असणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ शुभं आहे. 

कुंभ- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आपल्या कामात आपल्या नशीबाची पूर्ण साथ मिळणार आहे. तुमची अडकलेली काम पूर्ण होऊ शकणार आहेत. आपल्याला पुन्हा मान सन्मान मिळेल.

Disclaimer : इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.