Shadashtak Yoga: शनी आणि मंगळ बनवणार षडाष्टक योग, 'या' राशींच्या अडचणी वाढणार

यावेळी 4 राशी आहेत ज्यांनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे. 

Updated: Oct 16, 2022, 10:17 AM IST
Shadashtak Yoga: शनी आणि मंगळ बनवणार षडाष्टक योग, 'या' राशींच्या अडचणी वाढणार title=

मुंबई : वैदिक ज्योतिष शास्त्राप्रमाणे, ज्यावेळी एखादा ग्रह गोचर किंवा दुसऱ्याशी योग करतो, त्यावेळी त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होताना दिसतो. यंदाच्या वेळी शनि आणि मंगळ ग्रह अशुभ षडाष्टक योग तयार करणार आहेत. ज्योतिषशास्त्रात शनि आणि मंगळ या दोन्ही ग्रहांमध्ये शत्रुत्व आहे. त्यामुळे सर्व राशींवर या योगाचा प्रभाव दिसून येईल. यावेळी 4 राशी आहेत ज्यांनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे. 

मिथुन 

षडाष्टक योग या राशीच्या व्यक्तींसाठी त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे यावेळी कोणत्याही प्रकारची पैशांची गुंतवणूक टाळावी. त्याच तसंच तुमच्या जोडीदाराशी संबंधांमध्ये कटुता येऊ शकते. तुम्ही व्यवसायात कोणत्याही नवीन कराराला अंतिम रूप देण टाळा. शेअर्स आणि जुगारात पैसे गुंतवणं टाळा.

मकर

षडाष्टक योग तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. यावेळीतुम्हाला मित्रांसोबतही सावध राहण्याची गरज आहे. तसंच गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं. शिवाय काळजी घ्या कारण दुखापत आणि अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

कर्क 

कर्क राशीच्या व्यक्तींना हा अशुभ योग तयार झाल्यामुळे सावध राहावं लागणार आहे. मंगळ तुमच्या कुंडलीच्या 12व्या घरात असून तो ज्योतिषशास्त्रात अत्यंत धोकादायक मानला जातो. इतकंच नाही तर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. तसंच काळजी घ्या कारण व्यवसायात नुकसान होऊ शकतं.

वृश्चिक 

षडाष्टक या राशींच्या व्यक्तींसाठी त्रासदायक ठरू शकतो. गाडी चालवताना काळजी घ्यावी कारण अपघात होण्याची चिन्ह आहेत. तुमच्या मित्राला किंवा इतर कोणालाही पैसे देणं टाळा. व्यापाऱ्यांनीही काळजी घेत नवीन गुंतवणूक टाळली पाहिजे.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)