Scorpio Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे वृश्चिक राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. (Scorpio April 2024 Horoscope vrishchi Rashi Bhavishya For April Monthly Rashifal in Marathi)
एप्रिल महिना वृश्चिक राशीच्या लोकांना सांगतोय की, या महिन्यात तुम्ही तुमच्या रोजच्या दैनंदिन कामातून ब्रेक घ्या, असं टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा सांगत आहेत. त्यानंतर पूर्णपणे रिजार्च होऊन तयार व्हावा. कारण तुम्हाला 100 टक्के काम करायचं आहे. या महिन्यात तुमच्यासमोर अशी परिस्थिती निर्माण होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीबद्दल महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे तुमची पर्सनल लाइफ डिस्टर्ब होऊ शकते. पण तुमचे विचार स्पष्ट ठेवा.
तुमचे विचार सर्वांसमोर मनमोकळेपणाने मांडा. कोणी तुमचं कितीही खास असेल तरीही भेदभाव नका करु. सत्याच्या बाजूने उभे राहा. कुठलाही गैरसमज असेल तर ते दूर करा. यानंतर नक्कीच तुम्हाला तुमच्या लोकांचं सहकार्य मिळेल आणि लोक तुम्हाला समजून घेईल.
कामाच्या ठिकाणी सगळं ठिक असेल. मात्र स्वत:ला खूप अधिक झोकून देऊ नका. समतोल राखून पुढे जा. जास्त जास्त कामापेक्षा चांगल्या प्रतिच्या कामावर भर द्या. जर तुमचं स्वत:चं काम असेल तर तुम्हाला एखाद्या प्रोजेक्ट मिळू शकतो. मात्र घाई करु नका. नियोजनबद्धतेने हळूवार पुढे जा.
आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्थिर असाल. कायद्याशी संबंध कुठलं प्रकरण किंवा कोर्टात कुठलं कायदेशीर प्रकरण असेल तर त्याचा निर्णय तुमच्या बाजूने लागेल. जमीन किंवा मालमत्तेमध्ये तुम्ही गुंतवणूक करु शकता.
आरोग्याबद्दल खूप जास्त लक्ष देण्याची गरज आहे. एप्रिल महिना हा तुमच्या मानसिक आणि शारीरिक शांत मिळवण्याचा आहे.
या महिन्यात तुमचे कर्म चांगले ठेवा. हळूहळू आयुष्यात पुढे जा. सत्याच्या बाजूने उभे राहा. नियोजन करुन पुढे जा. तुमच्या कामात वेळ लागेल पण ते वेळेत पूर्ण होतील. या महिन्यात तुम्ही जर एखाद्या गरजू लोकांना औषधं दान कराल तर त्यातून तुम्हाला फायदा होईल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)