Shani-Budh: 30 वर्षांनंतर जवळ येणार शनी आणि बुध; 'या' राशींना मिळू शकतो भरपूर लाभ

Conjunction Of Shani And Budh: व्यापार देणारा बुध आणि फल देणारा शनिदेव यांची युती होणार आहे. कुंभ राशीमध्ये शनी आणि बुध यांचा संयोग सुमारे 30 वर्षांनंतर तयार होणार आहे.

सुरभि जगदीश | Updated: Dec 13, 2023, 11:00 AM IST
Shani-Budh: 30 वर्षांनंतर जवळ येणार शनी आणि बुध; 'या' राशींना मिळू शकतो भरपूर लाभ title=

Conjunction Of Shani And Budh: ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी नव्या वर्षात देखील अनेक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. 2024 मध्ये अनेक शुभ ग्रहांचा संयोग होणार आहे. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होणार आहे. 

2024 च्या सुरुवातीला म्हणजेच नव्या वर्षात दोन अनुकूल ग्रहांचा संयोग होणार आहे. यावेळी व्यापार देणारा बुध आणि फल देणारा शनिदेव यांची युती होणार आहे. कुंभ राशीमध्ये शनी आणि बुध यांचा संयोग सुमारे 30 वर्षांनंतर तयार होणार आहे. ज्यामुळे काही राशींचे नशीब चमकू शकणार आहे. 

मेष रास (Aries Zodiac)

बुध आणि शनीचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. 2024 मध्ये तुमचे उत्पन्न वाढणार आहे. स्त्रोताची नवीन माध्यमे तयार होतील. या राशीचे विद्यार्थी जे सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकणार आहे. तुम्हाला गुंतवणुकीचा फायदाही होणार आहे. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ रास (Kumbh Zodiac)

बुध आणि शनीची जोडी तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. 2024 हे वर्ष व्यावसायिकांसाठी खूप फायदेशीर असणार आहे. व्यवसायात चांगला नफा होईल. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळत राहतील. तसेच, नोकरदार लोकांसाठी नोकरीत बढती आणि वाढ होण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)

बुध आणि शनीचा संयोग तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. या वेळी वाहन व मालमत्तेचे सुख मिळू शकणार आहे. नोकरदार लोकांचे चांगले उत्पन्न आणि प्रभाव देखील वाढेल. स्वतःचा नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता. कामाच्या ठिकाणी व्यवस्थित वातावरण राहील. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन यावेळी आनंदी असणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)