Budh Vakri: पुढचे 8 दिवस बुधाची वक्री चाल 'या' राशींना देणार भरपूर पैसा; नोकरी-व्यापारात मिळणार यश

Budh Vakri : 15 सप्टेंबरपर्यंत बुध ग्रह वक्री राहणार आहे. दरम्यान बुध ग्रहाच्या या वक्री चालीचा काही राशीच्या लोकांना फायदा होईल. यावेळी 3 राशी आहेत ज्यांना बुध वक्रीचे शुभ परिणाम मिळणार आहेत. 

सुरभि जगदीश | Updated: Sep 8, 2023, 05:40 AM IST
Budh Vakri: पुढचे 8 दिवस बुधाची वक्री चाल 'या' राशींना देणार भरपूर पैसा; नोकरी-व्यापारात मिळणार यश title=

Budh Vakri: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या स्थितीमध्ये बदल करतात. अशातच ग्रहांचा राजकुमार आणि व्यवसाय, बुद्धिमत्ता यांचा कारक असलेल्या बुध ग्रहाने त्याच्या स्थितीत बदल केला आहे. 24 ऑगस्टला बुध वक्री झाला आहे. म्हणजेच बुध ग्रह वक्री चाल चालतोय.

15 सप्टेंबरपर्यंत बुध ग्रह वक्री राहणार आहे. दरम्यान बुध ग्रहाच्या या वक्री चालीचा काही राशीच्या लोकांना फायदा होईल. यावेळी 3 राशी आहेत ज्यांना बुध वक्रीचे शुभ परिणाम मिळणार आहेत. या राशीच्या व्यक्तींना 15 सप्टेंबरपर्यंत खूप आनंद मिळणार असून, घरात पैशांची चणचण भासणार नाहीये. 

तूळ रास 

तूळ राशीच्या लोकांसाठी बुधाची उल्टी चाल खूप शुभ आणि फलदायी ठरू शकणार आहे. या काळात व्यावसायिकांना मोठा लाभ मिळू शकणार आहे. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळू शकतो. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. तुमची कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. यावेळी या राशीच्या व्यक्तींना सर्व भौतिक सुखं मिळू शकणार आहेत.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधाची वक्री गती खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. तुमचे रखडलेले पैसेही तुम्हाला या काळात मिळू शकतात. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती कराल. व्यावसायिकांना पैसे मिळतील. नोकरी बदलण्यासाठी उत्तम काळ आहे. कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणारे विद्यार्थी विजयी होऊ शकतात. तुम्हाला अपघाती पैसे मिळू शकतात.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी बुधाची वक्री चाल अनुकूल ठरणार आहे. नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची योजना प्रत्यक्षात येऊ शकते. तुमचा आत्मविश्वास या काळात वाढणार आहे. कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. वैवाहिक जीवनासाठी हा काळ शुभ आहे. व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा मिळू शकतो.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )