मुंबई : आयुष्यात जसं अन्न, वस्त्र निवारा या गरजा आहेत तशीच प्रेम ही देखील एक महत्त्वाची मानसिक गरज आहे. आयुष्यभर आपली कोणीतरी निस्वार्थीपणे साथ देणारा पार्टनर असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते.
12 राशी तेवढे स्वभाव आणि प्रकृती. 12 राशींपैकी 5 राशीच्या व्यक्ती या प्रेमात विश्वासघात करण्यात माहित असतात असं म्हटलं जातं. या पाच राशी कोणत्या आहेत त्यांचा स्वभाव कसा असतो जाणून घेऊया.
मेष : ज्योतिष शास्त्रानुसार तुमचा पार्टनर मेष राशीचा असेल तर त्याला कोणत्याही कामासाठी रोखू नका. या राशीच्या लोकांना टोकलेलं अजिबात आवडत नाही.
मिथुन : या राशीचे लोक सकारात्मक आणि ऊर्जावान असतात. या राशीचे लोक आकर्षक असतात. या लोकांना नवीन गोष्टी करायला खूप आवडतात. त्याच त्याच गोष्टींमुळे या राशीचे लोक बोर होतात. असे लोक रिलेशनशिपमध्ये देखील लवकर कंटाळतात. पार्टनरला विसरायला हे लोक कमी करत नाहीत.
वृश्चिक : या राशीचे लोक दिलेली कमिटमेंट मोडतात. या राशीचे लोक धोका देण्यात माहिर असतात. या राशीचे लोक फ्लर्ट करण्यात उस्ताद असतात. जास्त वेळ रिलेशनमध्ये राहाणं पसंत करत नाहीत.
धनु : या लोकांना अॅव्हेंचर करण्यात जास्त आवड असते. या लोकांना रोखलं किंवा जाब विचारला तर आवडत नाही. या राशीचे लोक दुसऱ्यांचं मन मोडण्यात माहिर असतात.
सिंह : या राशीच्या लोकांच्या प्रेमात पडण्याची चूक करू नका. त्यांना स्वत:पेक्षा जास्त दुसरं काही प्रिय नसतं. त्यामुळे वेळीच सावध राहा.