Dhanteras Shubh Rajyog Astrology / Kalatmak Rajyog : हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी करण्यात येते. या दिवशी माता लक्ष्मी, कुबेरदेव आणि आरोग्यदेवता धन्वंतरीची पूजा करण्यात येते. यंदा धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला असणार आहे. या दिवशीपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची धनत्रयोदशी अतिशय शुभ आणि भाग्यशाली ठरणार आहे. कारण यादिवशी चंद्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. कन्या राशीत धन आणि वैभवचा कारक शुक्र देव आधीपासून उपस्थित आहे. अशा स्थितीत चंद्र शुक्र युतीमुळे कलात्मक राजयोग तयार होणार आहे. त्यात हस्त नक्षत्रात हा राजयोग येत असल्याने तीन राशींच्या लोकांना कुबेराचा खजिना प्राप्त होणार आहे. (Rare Kalatmak Rajyoga on Dhanteras or Dhantrayodashi 2023 These zodiac signs will get Kuber s treasure diwali 2023)
कर्क राशीच्या भाग्यस्थानात कलात्मक राजयोग अतिशय प्रभावी ठरणार आहे. या राशीत सध्या राहूसोबत नेपच्यूनची असणार आहे. हा योग कुंडलीत नवमस्थानात असल्याने खूप भाग्यशाली ठरणार आहे. मालमत्तासंबंधित हा योग शुभ ठरणार आहे. कलात्मक योगामुळे तुमचे अनेक कामं मार्गी लागणार आहे. आरोग्यात सुधारणा होणार आहे. या काळात एक सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये असणार आहे. तुमची सकारात्मक ऊर्जा अडचणीवर मात करण्यात यशस्वी होणार आहे.
कलात्मक योग हा कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या योगामुळे तुमच्यामधील कलागुणांना या काळात प्रोत्साहन मिळणार आहे. नोकरी व्यवसायात महत्त्वाचं निर्णय विचारपूर्वक आणि तज्ज्ञांच्या सल्लाने घ्या. तुमच्या आत्मविश्वास दुप्पटीने वाढणार आहे. या काळात तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होणार आहे. तुमचं बँक बॅलेन्स घवघशीत वाढणार आहे. तुमचं मानसिक आरोग्य या काळात सुधारणार आहे. जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालविणार आहात.
कलात्मक राजयोग मकर राशीसाठी वरदान ठरणार आहे. शनी आणि गुरुदेवाचा भक्कम पाठिंबा तुम्हाला लाभणार आहे. त्यामुळे प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी महत्त्वाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा राजयोग यश आणि प्रगती घेऊन येणार आहे. अगदी परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे योग आहेत. कामासंबंधात तुमचे निर्णय योग ठरणार आहेत. प्रवासाचे योगही आहेत. अचानक तुम्हाला धनलाभ होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)