Rajadhiraja Yoga : रंकाचाही राजा करतो 'हा' अद्भूत योग; पाहा तुमच्या पत्रिकेत आहे का?

Shubh Yog : आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र आपल्या भविष्याची वाटचाल ठरवतात. जर तुमच्या कुंडलीत हा योग असेल तर रंकदेखील राजा होतो. त्याला कीर्ती, समृद्धी, धन आणि प्रतिष्ठा सगळं मिळतं.   

नेहा चौधरी | Updated: Jul 12, 2023, 02:39 PM IST
Rajadhiraja Yoga : रंकाचाही राजा करतो 'हा' अद्भूत योग; पाहा तुमच्या पत्रिकेत आहे का? title=
Rajadhiraja Yoga shubh yog in kundali will make people super rich astrology news

Rajyog In Kundali : प्रत्येकाला वाटतं आपण श्रीमंत व्हावं आणि पण राजासारखं आयुष्य जगावं. पण तुमची कुंडली ग्रह तारे यावर अनेक तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी अवलंबून आहेत. कुंडलीतील 9 ग्रहांची स्थिती ही तुमचं आर्थिक, वैवाहिक आणि करिअर, मुलं अशा अनेक गोष्टी ठरवतात. त्यामुळे वैदिक ज्योतिषशास्त्रात कुंडलीला अतिशय महत्त्व आहे. (Rajadhiraja Yoga shubh yog in kundali will make people super rich astrology news)

कुंडलीत ग्रह गोचरमुळे अनेक योग तयार होत असतात काही हे तुमच्यासाठी शुभ तर काही अशुभ असतात. कुंडलीतील राजाधिराज हा असा योग आहे, ज्यामुळे रंक देखील राजा होतो. राजाधिराज राजयोग तुमच्या आयुष्यात कीर्ती, समृद्धी, धन, प्रतिष्ठा सगळं आणतो. 

कसा तयार होतो राजाधिराज ?

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील पहिल्या, चौथ्या, सातव्या आणि दहाव्या घराला विष्णुस्थान असं म्हटलं जातं. त्याशिवाय हे घरं केंद्रभाव म्हणूनही ओळखलं जातं. तर कुंडलीतील पाचवं आणि नववं घर हे लक्ष्मीचं स्थान असतं. याला वैदिक ज्योतिषशास्त्रात त्रिकोण स्थान असं संबोधलं जातं. आता आपण पाहूयात राजाधिराज राजयोग कसा तयार होतो. जेव्हा विष्णू स्थान आणि लक्ष्मी स्थान यांचा संबंध जोडला जातो, तेव्हा हा राजयोग निर्माण होतो. 

राजयोगाचे फायदे

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एकूण 32 प्रकारचे राजयोग आहेत. हे राजयोग प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार परिणाम करतात. राजयोग हे सर्वाधिक शक्तीशाली तेव्हा होतात जेव्हा कुंडलीतील मध्यभागी किंवा त्रिकोण घरामध्ये ते निर्माण होतात. शिवाय जर कुंडलीतील दुसर्‍या किंवा अकराव्या घरात राजयोग तयार झाला तर तो शुभ असतो. 

या राजयोगामुळे जाचकाच्या आयुष्यात अनेक परिणाम करतात. त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद येतो. करिअर किंवा व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. भौतिक सुख सुविधा वाढतात. 

त्याशिवाय तुमच्या कुंडलीतील हे राजयोग समाजात तुम्हाला मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देतात. 

 

हेसुद्धा वाचा - Mangal Guru Yuti : मंगळ - गुरुच्या युतीने 50 वर्षांनंतर दुर्मिळ 'नवपंचम राजयोग', 4 राशीच्या लोकांचे अच्छे दिन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)