Mangal Guru Yuti : मंगळ - गुरुच्या युतीने 50 वर्षांनंतर दुर्मिळ 'नवपंचम राजयोग', 4 राशीच्या लोकांचे अच्छे दिन

Navpancham Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राशीचक्रात रोज काही ना काही बदल होतं असतात. या राशीचक्राचा मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो. याच राशीचक्रातील मंगळ गुरुच्या युतीने 50 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे.

नेहा चौधरी | Updated: Jul 12, 2023, 08:01 AM IST
Mangal Guru Yuti : मंगळ - गुरुच्या युतीने 50 वर्षांनंतर दुर्मिळ 'नवपंचम राजयोग', 4 राशीच्या लोकांचे अच्छे दिन title=
guru mangal yuti making after 50 years navpancham rajyog these 4 zodiac signs will get money

Mangal Guru transit in Leo  in July 2023 : राशीचक्र याबद्दल जितक्या अभ्यास केला तितक्या कमी आहे. या राशीचक्रातील 9 ग्रहांच्या हालचालीमुळे मानवी आयुष्यावर आणि पृथ्वीवर त्याचा परिणाम होतो. हे परिणाम कधी सकारात्मक असतात तर कधी नकारात्मक असतात. राशीचक्रातील ग्रह गोचरमुळे अनेक शुभ अशुभ योग तयार होतात. देवगुरु बृहस्पती म्हणजेच गुरु मेष राशीत आहे तर मंगळ ग्रह सिंह राशीत आहे. जवळपास 50 वर्षांनी मंगळ आणि गुरुची युतीमुळे नवपंचम योग निर्माण होतो. (guru mangal yuti making after 50 years navpancham rajyog these 4 zodiac signs will get  money)

या दुर्मिळ नवपंचम राजयोगामुळे 18 ऑगस्टपर्यंत 4 राशीच्या लोकांचे अच्छे दिन असणार आहे. या काळात चार राशींच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार असून करिअर आणि व्यवसायात प्रगतीसोबत धनलाभाचे योग आहेत. कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी जाणून घ्या. 

धनु (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. मुलांच्या शिक्षणाची चिंता कमी होणार असून त्याला परदेशात शिक्षणाची संधी मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती बळकट होणार आहे. करिअरमध्ये उंच शिखर तुम्ही गाठणार आहात. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहणार असून लव्ह लाइफ रोमँटिक असणार आहे. 

कर्क (Cancer)

नवपंचम रायजोगामुळे कर्क राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहे. अगदी हवी तिथे बदलीहीदेखील तुम्हाला मिळू शकते. व्यवसायिकांसाठी धनलाभाचे योग आहेत. कुंडलीतील धन घरात मंगळ असल्याने या लोकांना धनलाभाचे योग आहेत. 

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग नशिबाला कलाटणी देणारा ठरणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार असल्याने तुम्ही तणावमुक्त होणार आहे. समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे. तुमचं कौतुक होणार असल्याने तुम्ही आनंदी असणार आहात. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचे बेत आखणार आहात. 

मेष (Aries)

नवपंचम राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. मेष राशीच्या लोकांचा स्वामी हा मंगळ आहे आणि तो सिंह राशीत विराजमान आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांना सर्वाधिक धनलाभ होणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी तुम्हाला प्रगतीची मार्गावर घेऊन जाणार आहे. नवीन कामं किंवा नवीन करारासाठी हा उत्तम काळ असणार आहे. 

हेसुद्धा वाचा - श्रावणाच्या आधी 'या' राशींचं नशीब सूर्यासारखं चमकणार, सूर्य गोचरमुळे आर्थिक लाभाचा सुवर्ण योग

 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )