Rahu Gochar : मायावी राहू गोचरमुळे 'या' 3 राशींवर कोप! 2025 पर्यंत आयुष्य संकटाने घेरणार

Rahu Gochar 2023 : नऊ ग्रहांमधील छाया ग्रह आणि मायावी राहू लवकरच गोचर करणार आहे. त्यामुळे 3 राशींच्या लोकांवर आर्थिक संकट कोसळणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 19, 2023, 12:00 PM IST
Rahu Gochar : मायावी राहू गोचरमुळे 'या' 3 राशींवर कोप! 2025 पर्यंत आयुष्य संकटाने घेरणार title=
rahu transit libra these 3 zodiac signs Life will be surrounded by crisis till 2025

Rahu Gochar 2023 Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांना अतिशय महत्त्व आहे. यातील शनि आणि राहू केतू यांचं नाव घेतलं तरी जाचकाला घाम फुटतो. शनि देव हा न्यायदेवता आहे. तर राहू आणि केतू यांना छाया ग्रह आणि मायावी असं म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्रानुासर राहू केतूमुळे जाचकाच्या आयुष्यात मानसिक संकटांचा सामना करावा लागतो. यांचं आयुष्य अनेक संकटाने वेढलेलं असतं. तब्बल दीड वर्षांनी राहू मीन राशीत प्रवेश करणार आहे. 30 ऑक्टोबरला संध्याकाळी राहू मीन राशीत गोचर करेल आणि तिथे तो मार्च 2025 पर्यंत विराजमान असणार आहे. त्यामुळे पुढील दीड वर्ष तीन राशींसाठी कठीण असणार आहे. (rahu transit libra these 3 zodiac signs Life will be surrounded by crisis till 2025) 

'या' राशींसाठी पुढचा काळ अचडणींचा!

तूळ (Libra Zodiac)

या राशीच्या लोकांना राहूचा मीन राशीत गोचर करणार आहे, त्यामुळे तुम्हाला कामात विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. जेवढी मेहनत कराल तेवढंच यश मिळणार आहे. या काळात व्यावसायिकांनी कर्ज घेणे टाळा. कर्ज घेतल्याशिवाय तुमचं काम होणार नसेल तर ते कसं परतफेड कराल याची योजन आधी आखा नाही तर भविष्यात अचडणीत सापडू शकता. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)

वृश्चिक राशीच्या लोकांना राहू गोचरमुळे अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. खास करुन व्यावसायिकांना या काळात जपून राहावं लागणार आहे. या लोकांनी आर्थिक व्यवहार करताना काळजीपूर्वक करावा अन्यथा मोठं नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. आर्थिक निर्णय घेताना तुम्हाली सर्व बाजूने विचार करावा लागणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Tirgrahi Yog 2023 : तूळ राशीत त्रिग्रह योगामुळे 'विनाशकारी विस्फोट योग'; 'या' लोकांना धनहानीसोबत आरोग्याची समस्या

धनु (Sagittarius Zodiac)

या राशीच्या लोकांना व्यावसायासोबतच कुटुंबासाठी वेळ काढावा लागणार आहे. या काळात तुमचं कौटुबिक जीवन असंतुलित होण्याची भीती आहे. व्यावसायिकांनी व्यवसाय वाढीसाठी नेटवर्किंगवर भर देणं गरजेचं आहे. मालमत्ता किंवा जमीन खरेदी करताना सर्व कायदेशीर बाबी तपासून घ्या. अन्यथा फसवणुकीचे शिकार होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)