Navratri 2023 : आज नवरात्रीची पाचवी माळ! स्कंदमातेची करा उपासना, या मंत्राचा आणि उत्तम उपायाचा घ्या लाभ

Navratri 5th Day 2023 : आज शारदीय नवरात्रीची पाचवी माळ आहे. आज सिंहावर स्वार असणाऱ्या दुर्गा देवीच्या पाचव्या रुपात स्कंदमातेची पूजा करण्यात येणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 19, 2023, 12:05 AM IST
Navratri 2023 : आज नवरात्रीची पाचवी माळ! स्कंदमातेची करा उपासना, या मंत्राचा आणि उत्तम उपायाचा घ्या लाभ title=
shardiya navratri 2023 5th day devi skandmata puja vidhi aarti mantra and bhog and mahaupay and navratri 5th day colors Yellow Thursday

Shardiya Navratri 5th Day 2023 : शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2022) सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची (Devi Skandamata) पूजा करण्याचा नियम आहे. मोक्षाचे दरवाजे उघडणारी माता म्हणून स्कंदमातेची पूजा केली जाते. स्कंदमाता भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते असे म्हणतात. देवी दुर्गेचे पाचवे रूप असलेल्या स्कंदमातेची उपासना केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात आनंद मिळतो. संतती प्राप्तीसाठी स्कंदमातेची पूजा करणे लाभदायक मानले जाते. स्कंदमातेची पूजा केल्याने भक्ताला मोक्ष प्राप्त होतो. सूर्यमालेची अधिष्ठाता देवता असल्याने, तिची पूजा केल्याने, भक्त अलौकिक तेजस्वी आणि तेजस्वी बनतो. (shardiya navratri 2023 5th day devi skandmata puja vidhi aarti mantra and bhog and mahaupay and navratri 5th day colors Yellow Thursday)

गुरुवारचा रंग आणि पाचवी माळ

गुरुवारचा रंग हा पिवळा आहे. पाचवी माळ ही बेल किंवा कुंकवाची वाहतात.

देवी स्कंदमातेचे रुप

देवीचं हे पाचवं रुप प्रत्येकांला मोहून टाकतं. चार हात आणि दोन हातात कमळ धारण केली ही देवी सिंहावर विराजमान. स्कंदमातेच्या कुशीत बालकाच्या रुपात भगवान स्कंद विराजमान आहे. 

देवी स्कंदमाता पूजा विधी

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी सकाळी उठून स्नान शक्य असल्यास हिरवे वस्त्र परिधान करा.  स्कंदमाताला हिरवा रंग प्रिय आहे.  त्यानंतर घराच्या मंदिरात किंवा पूजास्थळी पाट किंवा चौरंगावर स्कंदमातेचं चित्र किंवा मूर्ती स्थापित करा. यानंतर गंगाजलाने शुद्ध करून कलशात पाणी घेऊन त्यात काही नाणी टाकून कलश स्थापना करा. आता पूजेचे व्रत घेऊन स्कंदमातेला रोळी-कुमकुम लावा आणि नैवेद्य अर्पण करा. आता धूप-दीपातून आईची आरती करा आणि आरतीनंतर घरातील सर्व लोकांना प्रसाद वाटप करा. 

स्कंदमातेची कथा

पौराणिक मान्यतेनुसार, तारकासुर नावाचा एक राक्षस होता. त्याचा मृत्यू हा केवळ शिवपूत्रच करु शकणार होता. मग माता पार्वतीने आपल्या मुलाला भगवान स्कंद (कार्तिकेयाचं दुसरं नाव) युद्धासाठी प्रशिक्षित करण्यासाठी स्कंदमातेचं रूप धारण केलं. त्यांनी भगवान स्कंद यांना युद्धाचं प्रशिक्षण दिलं आणि स्कंदने तारकासुरचा वध केला अशी आख्यायिका आहे. 

स्कंदमाता मंत्र

ॐ देवी स्कन्दमातायै नमः॥

प्रार्थना मंत्र

सिंहासनगता नित्यं पद्माञ्चित करद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी॥

स्कंदमातेची स्तुति

सर्वभू‍तेषु माँ स्कन्दमाता रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी उपाय 

तुमच्या घराजवळ असलेल्या कोणत्याही शक्तिपीठात किंवा देवीच्या मंदिरात तुपाचा दिवा लावा. त्यानंतर देवी भगवतीची 32 नावं मनोभावे वाचन करा. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा माता पूर्ण करते असं मान्यता आहे. 

स्कंद मातेची आरती 

जय तेरी हो स्कंद माता 
पांचवां नाम तुम्हारा आता 
सब के मन की जानन हारी 
जग जननी सब की महतारी 
तेरी ज्योत जलाता रहूं मैं 
हरदम तुम्हें ध्याता रहूं मैं   
कई नामों से तुझे पुकारा 
मुझे एक है तेरा सहारा 
कहीं पहाड़ों पर है डेरा 
कई शहरो मैं तेरा बसेरा 

हर मंदिर में तेरे नजारे 
गुण गाए तेरे भगत प्यारे 
भक्ति अपनी मुझे दिला दो 
शक्ति मेरी बिगड़ी बना दो 
इंद्र आदि देवता मिल सारे 
करे पुकार तुम्हारे द्वारे 
दुष्ट दैत्य जब चढ़ कर आए 
तुम ही खंडा हाथ उठाए 
दास को सदा बचाने आई 
'चमन' की आस पुराने आई..

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)