Putrada Ekadashi 2023 : पुत्रदा एकादशीला दुर्मिळ योगायोग! 6 राशींवर होईल हरीची कृपा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Putrada Ekadashi 2023 : आज पुत्रदा एकादशीचं व्रत पाळण्यात येणार आहे. आज दुर्मिळ असा योगायोग जुळून आल्यामुळे 6 राशींचं भाग्य चमकणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Aug 27, 2023, 05:25 AM IST
Putrada Ekadashi 2023 : पुत्रदा एकादशीला दुर्मिळ योगायोग! 6 राशींवर होईल हरीची कृपा, सर्व इच्छा होतील पूर्ण title=
Putrada Ekadashi 2023 horoscope 27 august 2023 lucky zodiac signs

Sawan Putrada Ekadashi 2023 : आज श्रावण पुत्रदा एकादशीचं व्रत आहे. हा दिवस भगवान विष्णुला समर्पित केलं आहे. श्रावणातील या एकादशीला दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. श्री हरी आणि महादेव या दोघांची कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे. यासोबत आज अतिशय शुभ असा योगायोग जुळून आले आहेत. आज प्रीति योग, आयुष्मान योग, रवि योग, सावर्थ सिद्धी योग आणि बुधादित्य योग आहे. (Putrada Ekadashi 2023 horoscope 27 august 2023 lucky zodiac signs)

त्यामुळे या दुर्मिळ योगायोगचा फायदा 6 राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. पुत्रदा एकादशी या लोकांच्या आयुष्यातील अडचणी दूर करणारी ठरणार आहे. चला जाणून घेऊयात कुठल्या आहेत या भाग्यशाली राशी..

मेष (Aries)

पुत्रदा एकादशीचा दिवस या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. तुम्हाला कामात यश मिळेल आणि चांगली बातमी मिळेल.  अध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. धार्मिक रुचीमुळे तुम्ही एखाद्या तिर्थक्षेत्राला भेट देणार आहात. 

वृषभ (Taurus)  

एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांना लाभदायक ठरणार आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कोर्टकचेरीच्या प्रकरणात यश मिळणार आहे. घरात आनंदाचं वातावरण असेल. व्यावसायिकांसाठी एकादशी शुभ ठरणार आहे. नोकरदारांना बढती मिळणार आहे. 

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी हा दिवस खूप फलदायी ठरणार आहे. आर्थिक फायदा होणार आहे. व्यावसायिकांसाठी चांगली बातमी मिळेल. पदोन्नतीची दाट शक्यता आहे. सहलीला जाण्याचा प्लन करणार आहे. 

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांसाठी पुत्रदा एकादशी लकी ठरणार आहे. वाहन, जमीन आणि मालमत्ता खरेदीचे योग आहेत. नोकरीची नवीन ऑफर मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी एकादशी फलदायी ठरणार आहे.आर्थिक लाभ होणार आहे. 

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांसाठी एकादशी शुभ ठरणार आहे. भगवान विष्णूसोबतच भगवान शिवाच्या आशिर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. नशिबाची साथ तुम्हाला लाभणार आहे. धनलाभाचे योग आहेत. कुटुंबात समृद्धी वाढणार आहे. 

मीन (Pisces)

या राशीच्या लोकांना आनंदीची बातमी कानी पडणार आहे. नोकरीत प्रगती घेऊन येणार एकादशी. विद्यार्थ्यांना यश प्राप्त होणार आहे.  संतानसुख प्राप्त होणार आहे. नवीन मालमत्ता खरेदीचे योग आहेत. 

हेसुद्धा वाचा - Shani Gochar 2023 : शनिदेव येत्या 18 महिन्यात बक्कळ पैशासोबत देणार नशिबाला कलाटणी, 'या' लोकांचे सोन्याहून पिवळा सुखाचा काळ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)