पुढचे १० दिवस अशुभ, मात्र 'या' शुभ गोष्टी बदलणार नशीब

या गोष्टी बदलतील तुमचे पुढचे १० दिवस 

Updated: Jan 6, 2022, 08:14 AM IST
पुढचे १० दिवस अशुभ, मात्र 'या' शुभ गोष्टी बदलणार नशीब  title=

मुंबई : पौष महिना हा अशुभ महिना समजला जातो. कारण या महिन्यात सूर्य कमी प्रकाश देतो. तसेच या महिन्यात कोणतंच शुभ काम केलं जात नाही. या महिन्यात लग्न-सोहळे, घर-गाडी खरेदी करणे, गृहप्रवेश, घर बांधणे अशी चांगली काम केली जात नाहीत. मात्र दान करणे, सूर्य देवाची आराधना करण्याकरता हा महिना चांगला असतो. ३ जानेवारीपासून पौष महिना सुरू झाला आहे तो १ फेब्रुवारीपर्यंत राहिल. 

पौष महिन्यातील शुक्ल पक्ष बहुत खास

पौष महिन्यातील शुक्ल पक्ष खूप खास आहे. या दरम्यान मकर संक्रांत साजरी केली जात आहे. यादिवशी पवित्र नदीत स्नान केली जाते. या काळात सूर्याची आराधना केली जाते. या दिवसापासून सूर्य धनू राशीमधून निघून मकर राशीत प्रवेश करतो. यानंतर पूर्ण तेजोमय वातावरण होईल. शुक्ल पक्षादरम्यान घरी नवीन गोष्ट आणली तर तुमचं संपूर्ण वर्ष चांगल जाणार आहे. 

पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात आई लक्ष्मीची मूर्ती आणून विधिनुसार तिची पूजा करून पूजाघरात प्रतिष्ठापना करावी. असे केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला वर्षभर पैशाची कमतरता भासणार नाही.

या 10 दिवसांमध्ये घरात लक्ष्मीजी आणि गणपतीची चांदीची मूर्ती आणून त्याची रोज पूजा केल्यास तुम्हाला भरपूर धनप्राप्ती होते.

पुढील 10 दिवसांत भरपूर तांबे आणून सूर्याला अर्पण केल्यास वर्षभर उत्तम यश मिळेल. सूर्य हा यशाचा कारक असून त्याच्या कृपेनेच यश, आत्मविश्वास आणि उत्तम आरोग्य मिळते.

मोतीशंख किंवा दक्षिणावर्ती शंख घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. पौष महिन्यातील शुक्ल पक्ष हा दक्षिणावर्ती शंख घरात आणण्यासाठी उत्तम मुहूर्त आहे. त्याची विधिवत स्थापना करून रोज पूजा करावी.

या काळात लाल किंवा पिवळे कपडे खरेदी करून परिधान केल्याने तुमचे नशीब उजळू शकते. याशिवाय तीळ आणि गूळ घरात आणणेही खूप शुभ असते.

लहान नारळ किंवा एक नारळ लाल कपड्यात बांधून घरात पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. या उपायाने भरपूर पैसा मिळतो.