Panchang Today : आज दुहेरी योग! संकष्टी चतुर्थीसोबत शिवयोग; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ

Panchang Today: आजचा दिवस अतिशय खास आहे. आज दुहेरी योग जुळून आला आहे. संकष्टी चतुर्थी सोबत आज शिवयोग आला आहे. धार्मिकदृष्टीने हा शुभ योग असून जाचकांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा हा दिवस आहे. 

नेहा चौधरी | Updated: May 8, 2023, 06:50 AM IST
Panchang Today : आज दुहेरी योग! संकष्टी चतुर्थीसोबत शिवयोग; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ title=
Panchang 08 May 2023 today Ekdant Sankashti Chaturthi 2023 and shiv yog monday upay shubh ashubh muhurat rahu kaal astrology news in marathi

Panchang 08 May 2023 in marathi : आज मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यातील पहिला दिवस अतिशय खास आहे. आज संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi 2023) आहे. ती पण एकंदत संकष्टी चतुर्थी (Ekdant Sankashti Chaturthi 2023)आहे. त्याशिवाय सोमवारी म्हणजे भगवान शंकराची उपासना करण्याचा दिवस. त्यासोबत आज शिवयोग (shiv yog) जुळून आला आहे. आजारापासून मुक्ता मिळवण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कुटुंबातील सदस्य किंवा तुम्ही सतत आजारी पडत असाल तर आज शंकराला अभिषेक करा. त्याशिवाय महामृत्युंजय मंत्राच्या  5 किंवा 11 वेळा जप करा. (astrology news in marathi).

चला मग पंचांगातून जाणून घेऊयात शुभ काळ, राहुकाळ, अशुभ काळ...(Panchang 08 May 2023 today Ekdant Sankashti Chaturthi 2023 and shiv yog monday upay shubh ashubh muhurat rahu kaal astrology news in marathi)

आजचं पंचांग खास मराठीत ! (panchang 08 May 2023 in marathi)

आजचा वार - सोमवार

तिथी - तृतीया - 18:20:51 पर्यंत

नक्षत्र - ज्येष्ठा - 19:10:39 पर्यंत

पक्ष - कृष्ण

योग - शिव - 24:08:28 पर्यंत

करण - वणिज - 07:21:14 पर्यंत, विष्टि - 18:20:51 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:07:05 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 07:03:05 वाजता

चंद्रोदय - 21:56:00

चंद्रास्त - 08:00:00

चंद्र रास - वृश्चिक - 19:10:39 पर्यंत

ऋतु - ग्रीष्म

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 13:00:57 पासुन 13:52:41 पर्यंत, 15:36:09 पासुन 16:27:53 पर्यंत

कुलिक – 15:36:09 पासुन 16:27:53 पर्यंत

कंटक – 08:42:18 पासुन 09:34:01 पर्यंत

राहु काळ – 07:44:05 पासुन 09:21:05 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 10:25:45 पासुन 11:17:29 पर्यंत

यमघण्ट – 12:09:13 पासुन 13:00:57 पर्यंत

यमगण्ड – 10:58:06 पासुन 12:35:06 पर्यंत

गुलिक काळ – 14:12:06 पासुन 15:49:06 पर्यंत

शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त - 12:09:13 पासुन 13:00:57 पर्यंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:56:00
महिना अमंत - वैशाख
महिना पूर्णिमंत - वैशाख

दिशा शूळ

पूर्व

चंद्रबलं आणि ताराबलं

चंद्रबल 

वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ

ताराबल

अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, रेवती

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)