पुढच्या 5 दिवसात चुकूनही करू नका ही कामं, होऊ शकतात गंभीर परिणाम

या 5 दिवसांमध्ये कोणतेही शुभ काम करू नये असं म्हटलं जातं. काही गोष्टी करताना विशेष काळजी घ्यावी असंही सांगितलं जातं. 

Updated: Jan 5, 2022, 08:24 PM IST
पुढच्या 5 दिवसात चुकूनही करू नका ही कामं, होऊ शकतात गंभीर परिणाम title=

मुंबई: नव्या वर्षाची सुरुवातही कोरोनाने झाली आहे. कुठेतरी दिलासा किंवा आशेचा किरण दिसेल असं वाटत असतानाच आता काही राशींसाठी पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. वर्षाची सुरुवात मासिक शिवरात्रीने झाली. आता पहिल्या आठवड्यातच पंचक सुरू होणार आहे. 

शास्त्रामध्ये पंचकांना खूप अशुभ मानलं जातं. त्यामुळे या काळात काही काम करण्यास सक्त मनाई आहे. अन्यथा ते जीवनात संकट आणू शकतात. 2022 सालचे पहिले पंचक उद्यापासून म्हणजेच 5 जानेवारी, बुधवारी सायंकाळी 7 वाजता सुरू होत आहे. 5 ते 10 जानेवारी पर्यंत विशेष काळजी घेणं बंधनकारक आहे. 

या 5 दिवसांमध्ये कोणतेही शुभ काम करू नये असं म्हटलं जातं. काही गोष्टी करताना विशेष काळजी घ्यावी असंही सांगितलं जातं. 

- पंचक दरम्यान कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचे अंतिम संस्कार विशिष्ट पद्धतीने करावेत. नाहीतर कुटुंबावर संकट येतं असं सांगितलं जातं.
- पंचकमध्ये बेड किंवा चारपाई कोणतीही वस्तू शक्यतो विकत घेऊ नये किंवा तयार करायला देऊ नये. 
- घर बांधत असाल तर छताला पंचक लावू नका, दाराला चौकट लावू नका. असे केल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात..
- पंचक काळात दक्षिण दिशेला प्रवास करू नये. असे करणे अशुभ आहे. दक्षिण ही यमाची दिशा मानली जाते.
- पंचक काळात गवत, लाकूड इत्यादी देखील गोळा करू नये.

(विशेष सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहीतकं आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची पुष्टी करत नाही.)