मुंबई : आपण पैसे कमावण्यासाठी खूप प्रयत्न तसंच मेहनत करत असतो. आलेला खर्च करायला वेळ लागत नाही. इतकंच नाही अनेकदा आपण अनावश्यक खर्च करतो आणि यामुळे दर महिन्याचं बजेट बिघडतं. कधी आजारपणामुळे, तर कधी चोरीमुळे किंवा अन्य काही कारणाने आपल्याकडे पैसे राहात नाहीत. मात्र यामागे वास्तू दोष किंवा त्याऐवजी, इतर दोष जबाबदार असू शकतो.
वास्तुशास्त्रानुसार पाहिलं तर घराच्या मुख्य दरवाजाला खूप महत्त्व देण्यात आलंय. दरवाजातून घरात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा येते. घराच्या मुख्य दरवाजाबाबत काही चूक झाली तर मोठा त्रास होऊ शकतो.
उदाहरणार्थ, घराच्या मुख्य दारावर स्वच्छता नसणं हे पैशाच्या कमतरतेचं एक मोठं कारण बनू शकतं. ज्या लोकांच्या घराच्या मुख्य दारात स्वच्छता नसते, त्यांच्या घरात नेहमीच आजारापण दिसून येतं. यावेळी कष्टाचे पैसे रूग्णालय आणि औषधांवर खर्च होतात. त्यामुळे मुख्य दरवाजावर कधीही अस्वच्छता ठेवू नका. दरवाजा स्वच्छ ठेवा आणि त्यावर स्वस्तिक, लक्ष्मीचे पाय असं शुभ चिन्ह बनवा.
दरम्यान खूप प्रयत्न करूनही जर तुमच्या घरात पैसा उभा राहत नसेल तर त्यामागे इतर वास्तू दोष देखील कारणीभूत असू शकतात. अशा स्थितीत रोज घरात चंदनाची अगरबत्ती लावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल.