Surya Shani Yuti On Basant Pachami 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा दोन ग्रहांचं मिलन होतं. असंच शनी आणि सूर्य या दोन्ही ग्रहांना विशेष महत्त्व आहे. नातेसंबंधात, दोघेही वडील आणि मुलगा आहेत. या दोघांमध्येही नेहमीच मतभेद असतात. या दोन ग्रहांचा संयोग शुभ मानला जात नाही, परंतु काही लोकांवर याचा शुभ प्रभावही पडतो.
आगामी बसंत पंचमी खूप खास असणार आहे. कारण सुमारे 30 वर्षांनंतर कुंभ राशीत सूर्य आणि शनीची भेट होणार आहे. शनी वर्षभर कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. सूर्य मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 14 फेब्रुवारी रोजी यांची भेट होणार असून काही राशींच्या व्यक्तींसाठी ही युती लकी ठरणार आहे.
सूर्य आणि शनीचा योग मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कार्यक्षेत्रात तुमची प्रशंसा होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. या काळात तुमचे धैर्य आणि शौर्यही वाढेल. आरोग्याबाबत सावध राहण्याची गरज आहे. तुमच्या जोडीदारासोबत चांगला समन्वय निर्माण होईल.
हे संयोजन मेष राशीच्या लोकांसाठी देखील अनुकूल असेल. पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणत्याही शुभ किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकणार आहे. तुम्ही देश-विदेशातही प्रवास करू शकता, जे शुभ राहणार आहे.
मिथुन राशीच्या लोकांसाठी देखील हे संयोजन शुभ राहणार आहे. जर तुमचे प्रेमसंबंध चालू असतील तर तुम्हाला त्यात यश मिळू शकते. व्यवसायासाठी हा काळ अनुकूल राहील. हा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. सामाजिक क्षेत्रात प्रभाव आणि प्रतिष्ठेचा लाभ मिळेल.
सिंह राशीच्या लोकांनाही ग्रहांच्या या मिलनाचा फायदा होणार आहे. करिअरसाठी वेळ चांगला राहील, प्रमोशन मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना फायदा होईल. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नाते अधिक घट्ट होईल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )