तुमच्या सुखाला कोणाचीही वाईट नजर लागू नये म्हणून करा हे पाच उपाय, नक्कीच पडेल फरक

घराला वाईट नजर लागल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यासोबतच कुटूंबात आपआपसात कलह वाढतो. वाईट नजरेमुळे नोकरी-व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागतो.

Updated: Apr 9, 2022, 08:38 AM IST
तुमच्या सुखाला कोणाचीही वाईट नजर लागू नये म्हणून करा हे पाच उपाय, नक्कीच पडेल फरक title=

मुंबई : वाईट नजर लागल्यास व्यवसाय आणि रोजगार ठप्प होतात. कामाच्या प्रगतीमध्ये अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होऊ लागतात. मुलं हसणं खेळणं हरवून बसतात. वाईट नजर जीवनाशी संबंधित सर्व गोष्टींवर परिणाम करतो. घर, वाहन आणि दुकानापासून ते खाण्यापिण्यापर्यंत सर्वच गोष्टींवर एकाच वेळी आणि क्षणार्धात परिणाम होऊ लागतो. त्यामुळे वाईट नजर लागू नये म्हणून काय उपाययोजना कराव्या याची माहिती घेऊ...

वाईट नजर लागू नये म्हणून उपाययोजना

जर तुम्हाला वाटतंय की, एखाद्या व्यक्तीची तुमच्या मुलांना नजर लागलीये, तर त्याच व्यक्तीच्या हात तुमच्या मुलांच्या डोक्यावरून फिरवून घ्या, यामुळे नजर दोष नष्ट होतो.

घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कलह असल्यास किंवा घरातील कोणत्याही सदस्याला नजर लागल्याचे वाटल्यास दररोज सुंदरकांडचा पाठ करावा. तसेच घरात अगरबत्ती लावावी. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते.

घरातील लहान बाळाला नजर लागलीये असे वाटल्यास, ते सतत रडत असल्यास, चिडचिड करीत असल्यास. एका तांब्याच्या पेल्यात पाणी आणि ताजे फुलं घेऊन बाळाच्या डोक्यावरून 11 वेळा फिरवा. यामुळे वाईट नजर दोष नष्ट होतो.

जर तुम्हाला वाटत असेल की व्यवसायाला एखाद्याची नजर लागली आहे. ज्यामुळे व्यवसाय अचानक ठप्प झाला आहे. तर व्यवसायाच्या ठिकाणी लाल रंगाची हनुमानाची मूर्ती किंवा चित्र लावा.

रोज सकाळी त्याला लाल फुले अर्पण करा. तसेच धंद्याच्या ठिकाणी शंखामध्ये पाणी शिंपडावे. असे केल्याने व्यवसायात पुन्हा तेजी येते. आणि नजर दोष नष्ट होतो.