Nag Panchami 2024: नागपंचमीमधून आपली संस्कृती आपणास काय सांगते? तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

Nag Panchami 2024 Date : श्रावण महिन्याला सुरुवात झाली की वेध लागतात ते सणाउत्सवाचे.., श्रावणात पहिला सण येतो तो नागपंचमीचा. यंदा नागपंचमी कधी आहे, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Aug 6, 2024, 04:25 PM IST
Nag Panchami 2024: नागपंचमीमधून आपली संस्कृती आपणास काय सांगते? तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या  title=
Nag Panchami 2024 Date Puja Muhurat Puja Tips Nag panchami Shubh Muhurat in marathi

Nag Panchami 2024 and Shubh Muhurat in Marathi : भारतीय संस्कृतीत आपल्याला सृष्टीकडे प्रेमाने पाहायला शिकवलंय. हिंदू धर्मात गायीची पूजा केली जाते. वटसावित्रीला वडाची, तर पोळाला बैलाची पूजा करण्याची परंपरा आहे. शिवाय इतर वेळी सापाच नाव घेतल्यास आपण थरथर कापतो. पण नागपंचमीचा दिवशी आपण नागाची पूजा करतो. श्रावणला सुरुवात झाल्यानंतर पहिला सण येतो तो नागपंचमीचा. यंदा नागपंचमी कधी आहे, शुभ मुहूर्त काय आणि पूजाविधीसह जाणून घ्या सर्व माहिती. (Nag Panchami 2024 Date Puja Muhurat Puja Tips Nag panchami Shubh Muhurat in marathi)

नागपंचमी तिथी

मराठी पंचांगानुसार नागपंचमीचा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा करण्यात येतो. यंदा पंचमी तिथी शुक्रवारी 9 ऑगस्ट 2024 ला असल्याने यादिवशी नागाची पूजा केली जाणार आहे. 

नागपंचमी पूजा शुभ मुहूर्त

नागपंचमीच्या दिवशी मराठी पंचांगानुसार पुजेसाठी 3 तासांचा मुहूर्त आहे. 9 ऑगस्ट 2024 ला पहाटे 5.47 वाजल्यापासून सकाळी 8.27 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे. या शुभ मुहूर्तावर केलेली पूजा ही देवापर्यंत पोहोचते. 

हेसुद्धा वाचा - Nag Panchami 2024 : सापांच्या जीभेला दोन भाग का असतात? धार्मिक आणि शास्त्रीय कारण काय?

 नागपंचमी पूजा विधी

नागपंचमीला मंदिराजवळ चौरंग किंवा पाट किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढा. काही ठिकाणी मातीच्या नागाची पूजा केली जाते. आता दुर्वा, दही, गंध, अक्षता, फुलं अर्पण करुन त्याची मनोभावे पूजा करा. नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य अर्पण करा. त्यासोबतच कालसर्पदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी 'नमोsस्तु सर्पेभ्यो ये के च पृथ्वी मनु!' ये अंतरिक्षे ये दिवि तेभ्य: सर्पेभ्यो नम:! या मंत्राचा जप करावा, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय. या दिवशी घरात कोणताही पदार्थ चिरु किंवा कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये किंवा काही भाजू नये. तसंच कोणाची हिंसा करुन नये आणि जमिन खणू नये. 

नागपंचमीला कोणत्या नागांची पूजा केली जाते?

नागपंचमीला आठ नागांची वासुकी, ऐरावता, मणिभद्र, कालिया, धनंजय, तक्षक, कर्कोटकस्य आणि धृतराष्ट्र या नागांची पूजा करण्यात येते. 

नागपंचमीमधून आपली संस्कृती आपणास काय सांगते? 

आपली भारतीय संस्कृती सर्वांवर प्रेम करायला शिकवलं जातं. तसं पाहिलं तर नाग हा रानावनात राहणारा प्राणी पण पावसाळ्यात त्याचे घर पाण्याने भरते म्हणून तो गावात येतो. घराच्या वळचणीला बसतो. तो अतिथी, पाहुणा असतो म्हणून त्याचे पूजन करायचे. नागाला वनात राहणेच आवडते, त्याला पावित्र्य आवडते, स्वच्छता आवडते, सुगंध आवडतो आणि तो फुलाला जवळ करतो.

नागांचा आणखी एक गुण म्हणजे ते शेतांची राखण करतात. उंदीर, घुस इ. शेतात येऊ देत नाही. हे सुद्धा त्यांचं एक उपकारच आहे. नागाची पूजा म्हणजे विषारी सर्पातलाही चांगुलपणा पहावयास आपली संस्कृती सांगत आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)