Rahu-Budh Yuti Effects: ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह गोचर करतात. याचाच अर्थ ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. वैदिक दिनदर्शिकेनुसार, ग्रहांच्या गोचरमुळे शुभ आणि अशुभ योग तयार करतात. 7 मार्च रोजी ग्रहांचा राजकुमार मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी मायावी ग्रह राहू आधीच उपस्थित आहे.
या दोन ग्रहांच्या संयोगामुळे 18 वर्षांनंतर मीन राशीमध्ये जडत्व योग तयार होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. पण अशा 3 राशी आहेत ज्यांच्या अडचणी यावेळी वाढू शकणार असल्याचं म्हटलं जातंय. या लोकांना आर्थिक नुकसान आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावं लागू शकतं. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा त्रास होऊ शकतो ते पाहूयात
बुध आणि राहूचा संयोग तुमच्यासाठी अशुभ ठरू शकतो. कारण तुमच्या राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे यावेळी आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरीत पदोन्नती किंवा वेतनवाढीसाठी तुम्हाला आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. व्यावसायिकांना यावेळी आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे हुशारीने गुंतवणूक करा. तसेच कामाच्या ठिकाणी बेफिकीर राहू नका.
बुध आणि राहूचा विनाशकारी संयोग सिंह राशीच्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकतो. कारण हा संयोग तुमच्या राशीतून आठव्या भावात तयार होणार आहे. काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकते. आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात. जीवनशैलीत थोडासा बदल करणे खूप महत्वाचे आहे. नातेवाईकांशी तुमचे संबंध बिघडू शकतात. कोणतेही मोठे नवीन व्यावसायिक सौदे करू नका.
राहू आणि बुध यांचे संयोग तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतात. कारण बुध ग्रह तुमच्या राशीचा स्वामी आहे. यावेळी तुमच्या वैवाहिक जीवनात अशांतता येऊ शकते. कोणत्याही प्रकारचा गैरसमज टाळण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जोडीदाराशीही मतभेद होऊ शकतात. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही आव्हानांनाही सामोरं जावं लागेल. यावेळी तुमची तब्येतही बिघडू शकते. नोकरी आणि व्यवसायात चढ-उतार होऊ शकतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)