Haldi Che Upay: लग्नात, वैवाहिक जीवनात अडथळे येतायेत? हळदीशी संबंधित हे 5 उपाय आजच करा, मग पाहा चमत्कार

Haldi Che Upay: तुमच्या शुभ कार्यात पुन्हा पुन्हा अडथळा येत आहे का? तुमच्या लग्न कार्यात किंवा वैवाहिक जीवनात अडचण येत असेल किंवा तब्येत बिघडत असेल तर तुम्ही हळदीशी संबंधित 5 सोपे उपाय करु शकता.  

Updated: Sep 15, 2022, 09:39 AM IST
Haldi Che Upay: लग्नात, वैवाहिक जीवनात अडथळे येतायेत? हळदीशी संबंधित हे 5 उपाय आजच करा, मग पाहा चमत्कार title=

Haldi Che Totke: तुमच्या शुभ कार्यात पुन्हा पुन्हा अडथळा येत आहे का? तुमच्या लग्न कार्यात किंवा वैवाहिक जीवनात अडचण येत असेल किंवा तब्येत बिघडत असेल तर तुम्ही हळदीशी संबंधित 5 सोपे उपाय करु शकता. या उपायांचा परिणाम लवकरच दिसून येईल. हळद हा असा पदार्थ आहे, ज्यामध्ये एक नाही तर अनेक गुणधर्म आहेत. याचा उपयोग फक्त भाजी बनवण्यासाठीच होत नाही तर रोगांवर उपचार करण्यासाठीही केला जातो. एवढेच नाही तर प्रत्येक शुभ कार्यात हळदीचा वापर अनिवार्य मानण्यात आला आहे. शास्त्रानुसार भगवान विष्णूला हळद अत्यंत प्रिय आहे. हळदीशी संबंधित अनेक उपाय देखील प्रसिद्ध आहेत. त्यांचा वापर करुन माणसाचे नशीब  बदलायला वेळ लागत नाही. जाणून घ्या अशाच 5 उपायांबद्दल. 

वाईट स्वप्नांपासून मुक्त होणे

जर तुम्हाला रात्री भयानक स्वप्न पडत असतील तर तुम्ही हळदीचा उपाय करु शकता. तुम्ही हळदीच्या गुठळ्यावर मोली बांध. यानंतर ती मॉली डोक्याजवळ ठेवून झोपा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने वाईट स्वप्ने थांबतात आणि व्यक्ती चांगली झोपते. 

रखडलेली कामे पूर्ण होतील

तुमची रखलेली कामे पूर्ण होण्यासाठी हा उपया केल्यास फायदा होईल. दिलेले परत येत नसेल किंवा कुठेतरी अडकले असेल तर थोडे तांदूळ घेऊन त्यात हळद मिसळा. यानंतर ते तांदूळ लाल कपड्यात बांधून पर्समध्ये ठेवा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने अडकलेला पैसा लवकर परत येतो. 

लग्नातील अडथळे दूर होतात

अनेक प्रयत्न करुनही तुमच्या वैवाहिक जीवनात अडचण आहे. लग्न कार्यात अडथळा येत असेल. तसेच काही प्रसंगी बिघडले तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर रोज चिमूटभर हळद अर्पण करावी. तसेच दर गुरुवारी हरभरा डाळ आणि हळद दान करा. असे मानले जाते की या उपायाने तुमची समस्या दूर होईल आणि वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील. 

इच्छित कार्यात मिळेल यश

जर तुम्ही काही काम करण्यासाठी खूप मेहनत करत असाल पण त्यात यश मिळत नसेल तर तुम्ही हळदीचा उपाय करु शकता. बुधवारी गणपतीला संपूर्ण हळदीची माळ अर्पण करावी. असे केल्याने गणपती प्रसन्न होतो आणि कार्य यशस्वी होण्याच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतात असा विश्वास आहे. 

शुभ कार्यात मिळेल यश

जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी घराबाहेर जात असाल आणि तुम्हाला त्याच्या यशाबद्दल थोडीशीही शंका असेल तर तुम्ही हळदीचा टीका लावून गणेशजींचा आशीर्वाद घ्यावा. यानंतर हळदीचा कपाळावर तिलक लावा. असे म्हटले जाते की असे केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात आणि ज्या कामासाठी तुम्ही बाहेर जात आहात त्यात यश मिळते.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)