Mangal Grah Margi 2023: नववर्षाच्या (New Year 2023) सुरुवातीला राशीचक्रात अनेक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. काही वक्री ग्रह मार्गस्थ, तर काही ग्रह वक्री होणार आहेत. आता 13 जानेवारीला मंगळ ग्रह वृषभ राशीत मार्गस्थ (Mars Retrograde) होणार आहे. मंगळ हा ग्रह साहस आणि शौर्याचा प्रतिक आहे. त्यामुळे काही राशींवर सकारात्मक, तर काही राशींवर नकारात्मक परिणाम दिसून येईल. कुंडलीतील मंगळ ग्रहाची स्थिती व्यवस्थित असल्यास जीवन मंगलमय होतं. पण मंगळ कमकुवत असल्यास स्वभावात अहंकारपणा येतो. त्यामुले मंगळाचा स्थिती आणि स्वभाव किती महत्त्वाचा आहे, यावरून अधोरेखित होतं. मंगळ ग्रह मार्गस्थ होत असल्याने तीन राशींना विशेष फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत.
मीन (Meen)- ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह वृषभ राशीत मार्गस्थ होणार आहे. या स्थितीचा मीन राशीला फायदा होणार आहे. गोचर कुंडलीतील तिसऱ्या स्थानात मंगळ ग्रह मार्गस्थ होणार आहे. या स्थानाला साहस, पराक्रम आणि भाऊ-बहिणीचं स्थान मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, या स्थितीमुळे अडकलेली कामं पूर्ण होतील. भावंडांची साथ मिळेल. तसेच नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी मानसन्मान वाढेल.
कर्क (Kark)- मंगळ ग्रह मार्गस्थ होताच कर्क राशीच्या लोकांना लाभ मिळेल. मंगळ या राशीच्या 11 व्या स्थानात मार्गस्थ होणार आहे. या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचं स्थान मानलं जातं. या काळात उत्पन्नात वाढ होईल. जे लोक नोकरी करतात त्यांना लाभ होईल. पदोन्नती तसेच पगारवाढ मिळू शकते. न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल.
बातमी वाचा- Makar Sankanti 2023: मकर संक्रांतीला या वस्तूंचं दान करा आणि शनि-राहुच्या दोषापासून मुक्ती मिळवा
सिंह (Sinha)- या राशीच्या लोकांना मंगळाचा सकारात्मक प्रभाव जाणवेल. मंगळ ग्रह या राशीच्या दहाव्या स्थानात मार्गस्थ होणार असून हे स्थान नोकरी आणि कार्यक्षेत्राचं स्थान मानलं जातं. या काळात नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. विदेशात काम करण्याची संधी देखील चालून येईल. तसेच या काळात लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)