Adhik Maas 2023 : अधिक मासात जावयाला का असतं एवढं महत्त्व? 'या' एका वस्तूने मुलीचं आयुष्य होईल सुखी

Adhik Maas 2023 : धोंड्याच्या महिन्यात म्हणजे अधिक महिन्यात जावयाला खूप महत्त्व असतो. या महिन्यात जावयाला एक वस्तू भेट म्हणून द्या. तुमचं आणि मुलीचं आयुष्य खूप सुखी होतं. 

नेहा चौधरी | Updated: Jul 10, 2023, 03:42 PM IST
Adhik Maas 2023 : अधिक मासात जावयाला का असतं एवढं महत्त्व? 'या' एका वस्तूने मुलीचं आयुष्य होईल सुखी title=
Make the girls life happy by giving silver Niranjan to the son in law at adhik maas 2023 son in law importance in marathi

Adhik Maas 2023 : तब्बल 19 वर्षांनी अद्भूत संयोग जुळून आला आहे. यंदा श्रावण आणि अधिकमास एकत्र आला आहे. त्यामुळे यंदा श्रावण दोन महिने असणार आहे. अधिकमासला मलमास (malmas 2023) किंवा पुरुषोत्तम महिना (purushottam maas) देखील म्हटलं जातं. महाराष्ट्रात अधिक मासाला धोंड्याचा महिना या नावाने ओळखलं जातं. हिंदू धर्मात अधिकमास अतिशय पवित्र मानला जातो. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना सर्वाधिक खास असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा महिना म्हणजे जावयालाचे लाड करणाचा महिना असतो. 

या महिन्यात सासुरवाशीणीचे आई वडील जावयला घरी बोलवून त्यांचा रितसर पूजा अर्चा करुन पंचपक्वाने त्यांचा मानपान केला जातो. जावयाला अधिकमासाचं वाण दिलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे की अधिक मासात जावयाला एवढं महत्त्व का असतं ते? (Make the girls life happy by giving silver Niranjan to the son in law at adhik maas 2023 son in law importance in marathi )

चैत्रापासून फाल्गुनापर्यंत म्हणजे 12 महिन्यात 355 दिवस असतात, तर नक्षत्राप्रमाणे सौर वर्षाचे दिवस हे 365 दिवस असतात. याचा अर्थ 10 दिवस तीन वर्षांनी 30 झाल्यावर अधिकचा महिना येतो. वसिष्ठ सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांनंतर म्हणजे साधारण 33 महिन्यांनंतर येत असतो. म्हणून या महिन्यात 33 या आकड्याला तेवढंच महत्त्व आहे. म्हणून या महिन्यात 33 वस्तूचं दान, वाण, जणांना अन्नदान, जोडप्यांसह सामुहिक पूजा केली जाते.  

धोंड्याच्या महिन्यात जावयाला का महत्त्व?

तर हिंदू धर्मानुसार विवाह प्रथेनुसार जावयाला नारायणाचं रुप मानलं जातं. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास असतो. त्यामुळे या महिन्यात जावयाला नारायण रुप मानून पूजा केली जाते. म्हणून हिंदू धर्मात लग्न झालेल्या जोडप्यांना लक्ष्मी नारायणाचं रुप मानलं जातं. म्हणून अधिक मासात जावयाला तूपातील 33 अनारसे दिले जातात. एका चांदी किंवा तांब्याच्या ताटात हे अनारसे सजवून त्यात तुपाचा दिवा लावून हे वाण जावयाला दिलं जातं. यालाच जावयाचं वाण असं म्हणतात. 

ही वस्तू जावयाला द्या आणि लेकीचं आयुष्य सुखी करा!

मुलीचं आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला चांदीचे निरंजन नक्की द्या. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशिर्वाद मिळविण्यासाठी दिप दानाला महत्त्व आहे. म्हणून जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आशीवार्द मिळतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल चांदीचं का द्यावं तर लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे, त्यामुळे चांदीचं निरंजन द्यावं. 

जेव्हा तुम्ही चांदीचं निरंजन जावयाला देतात तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि केतू ग्रहांचे वाईट परिणाम कमी होतात. म्हणूनतुम्हा जावयाला अधिक मासात नक्की घरी बोलवा त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवा त्यासोबत 33 अनारसे, 33 बत्तासेसोबत एक चांदीचं निरांजन देऊन. 33 दिव्याने जावयाला नक्की औक्षवान करा. 

 ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )