Chandra Grahan 2023 : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण ऑक्टोबरमध्ये, राशींवर परिणाम होईल का?

Chandra Grahan 2023 : या वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण ऑक्टोबर महिन्यात असणार आहे. पेनम्ब्रल चंद्रग्रहण हे भारतात दिसणार असून याचा परिणाम राशींवर दिसून येणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jul 10, 2023, 01:56 PM IST
Chandra Grahan 2023 : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण ऑक्टोबरमध्ये, राशींवर परिणाम होईल का? title=
chandra grahan 2023 second lunar eclipse will be on 29 october zodiac signs get benefit in money

Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहण (Second Lunar Eclipse 2023) हे एक खगोलशास्त्रीय घटना आहे. जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते त्यावेळी चंद्रग्रहण होतो. वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण तीन महिन्यांनी असणार आहे. हे चंद्रग्रहण खास असून ते  पेनम्ब्रल चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. ही एक खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रानुसारही याला महत्त्व आहे. 

पंचांगानुसार ऑक्टोबर महिन्यातील 29 तारखेला रविवारी असणार आहे. चंद्रग्रहण  01:06 वाजता सुरू होईल आणि 02:22 वाजेपर्यंत असणार आहे. भारतात चंद्रग्रहणाचा कालावधी हा 1 तास 16 मिनिटांचा असणार आहे. हे ग्रहण अतिशय खास असणार आहे. कारण भारतात दिसणाऱ्या सर्व ग्रहणांपैकी एकमेव ग्रहण असणार आहे. (chandra grahan 2023 second lunar eclipse will be on 29 october zodiac signs get benefit in money )

कुठे दिसणार चंद्रग्रहण?

भारताशिवाय हे चंद्रग्रहण नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूतान, मंगोलिया, चीन, इराण, रशिया, कझाकिस्तान, सौदी अरेबिया, सुदान, इराक, तुर्की, अल्जेरिया, जर्मनी, पोलंड, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, इटली, युक्रेन, फ्रान्स, नॉर्वे, यूके, स्पेन, स्वीडन, मलेशिया, फिलीपिन्स, थायलंड, ऑस्ट्रेलिया, जपान आणि इंडोनेशिया या देशांमध्ये दिसणार आहे. 

सूतक असणार आहे का?

दुसऱ्या चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्याने सुतक काल असणार आहे. चंद्रग्रहणाच्या 9 तासांपूर्वी सुतककाल सुरु होणार आहे. त्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद होतील आणि सर्व शुभ कार्यावर बंदी घालण्यात येणार आहे. सुतक हे 28 ऑक्टोबरला दुपारी 2:52 पासून लागणार आहे. 

सुतक काळातीलहे करु नका !

मंदिरांचे दरवाजे बंद होतात
पूजेवर बंदी असते. 
खाणे किंवा स्वयंपाक करणे यावर बंदी
सुतक काळात झोपण्यावर बंदी
गरोदर स्त्रिया, लहान मुलं आणि वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी लागते.
गरोदर महिलांनी सुतक काळात अनेक बंधन असतात. 

चंद्रग्रहणाचा राशींवर काय परिणाम होणार?

ज्योतिषशास्त्रानुसार दुसऱ्या चंद्रग्रहणाला विशेष महत्त्व आहे. कारण ऑक्टोबर महिन्यात चंद्रग्रहणासोबत राहु केतू आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे याचा परिणाम बारांवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे चंद्रग्रहणाचा धनु आणि मिथुन राशीच्या लोकांना फायदा होणार असून त्यांना आर्थिक फायदा होणार आहे. तर मेष आणि मकर राशीच्या लोकांना सावध राहवं लागणार आहे. 

 ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )