Mahashivratri 2024 : 'या' वर्षातील महाशिवरात्री कधी? तारीख, पूजा मुहूर्त आणि विधी जाणून घ्या

Mahashivratri 2024 : देशभरात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. यंदाची महाशिवरात्री दरवर्षीपेक्षा अतिशय खास आहे. यादिवशी शिवलिंगात भगवान शंकराचा वास असतो असं म्हणतात. 

नेहा चौधरी | Updated: Feb 10, 2024, 11:07 AM IST
Mahashivratri 2024 : 'या' वर्षातील महाशिवरात्री कधी? तारीख, पूजा मुहूर्त आणि विधी जाणून घ्या title=
mahashivratri 2024 date shubh muhurta lord shiva puja significance and pooja rituals mahashivratri in marathi

Mahashivratri 2024 : मकर संक्रांतनंतर रथसप्तमी, माघी गणेशोत्सव आणि माघी गुप्तनवरात्रीनंतर वेध लागतात ते महाशिवरात्रीचे.  महाशिवरात्री ही देवांचं देव महादेव यांना समर्पित करण्यात आली आहे. यादिवशी माता पार्वती आणि भगवान शंकराच्या विवाहाचा हा सण अख्खा देशात मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्यात येतो. यादिवशी घरोघरी रुद्राभिषेक आणि शिव उपासना करण्यात येते. देशभरातील महादेवाच्या मंदिरात शिवभक्तांची गर्दी उसळलेली असते. (mahashivratri 2024 date shubh muhurta lord shiva puja significance and pooja rituals mahashivratri in marathi)

महाशिवरात्री कधी आहे? (Mahashivratri 2024 Date)

पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी करण्यात येते. यंदा 8 मार्चला रात्री 9.57 वाजेपासून 9 मार्चला संध्याकाळी 6.17 वाजेपर्यंत चतुर्दशी तिथी आहे. धार्मिक शास्त्रानुसार प्रदोष काळात भगवान शंकराची उपासना करण्यात येते. त्यामुळे 8 मार्चला महाशिवरात्री साजरा करण्यात येणार आहे. 

महाशिवरात्री 2024 मुहूर्त (Mahashivratri 2024 Muhurta)

महाशिवरात्रीची पूजा सूर्योदयापासून दिवसभरात कधीही करता येते. मात्र धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष आणि निशित काळतील पूजा अतिशय फलदायी मानली जाते.  पंचांगानुसार 9 मार्चला मध्यरात्री 12 वाजून 07 मिनिट ते 12 वाजून 56 मिनिटांपर्यंत निशिता पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे. 

निशिता काळ मुहूर्त -  9 मार्च 2024 ला 12.07AM ते 12.55AM
व्रत पारण मुहूर्त -  9 मार्च 2024 ला सकाळी 06.37 ते दुपारी 03.28 वाजेपर्यंत

हेसुद्धा वाचा - Magh Purnima 2024 : 'या' तारखेला साजरी होणार माघ पौर्णिमा, धार्मिक महत्त्व आणि पूजा विधी

महाशिवरात्रीची पूजा पद्धत

महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा. आता भगवान शिव आणि माता पार्वतीला नमस्कार करून व्रत आणि पूजा करण्याचा संकल्प करा. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. शिवमंदिरात जाऊन शिवाचा अभिषेक करावा किंवा घरी रुद्राभिषेक तुम्ही करु शकता. यासाठी शुभ मुहूर्तावर एका चौरंगावर लाल कापड परिधान करा. त्यानंतर माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केल्यानंतर भगवान शिवाला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करा. यानंतर पंचोपचार करा आणि विधीनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीला अभिषेक करुन पूजा करा. आता भगवान शंकराला भांग, धतुरा, फळं, मदार, बेलची पानं अर्पण करा. पार्वतीला श्रृंगार अर्पण नक्की करा. यानंतर शिव चालीसा किंवा शिवस्तोत्राचे पठण करा. भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करा.

महाशिवरात्री का साजरी केली जाते? (Mahashivratri Significance)

महाशिवरात्री हा सण दोन महत्त्वाच्या गोष्टींसाठी साजरा करण्यात येतो. या दिवशी भगवान शिव शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता, असं म्हणतात. तर दुसरं म्हणजे यादिवशी भगवान शिव प्रथमच प्रकट झाले होते अशी मान्यता आहे. यादिवशी शिव हे ज्योतिर्लिंगाच्या रुपात प्रकट झाले होते आणि ते 64 वेगवेगळ्या ठिकाणी शिवलिंगात दिसले होते. या दिवशी शिवाची पूजा केल्याने सर्व संकटं दूर होतात, असं धार्मिक शास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)