महाशिवरात्री२०१८ : ४७ वर्षांनंतर दूर्मिळ योग; 3 राशींना होणार घसघशीत फायदा

४७ वर्षांनतर योग जुळून येत आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये जोरदार उत्साह आहे. पण, विशेष असे की, एकूण १२ राशींपैकी तिन राशी मात्र यंदा नशिबवान ठरणार आहेत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 7, 2018, 03:28 PM IST
महाशिवरात्री२०१८ : ४७ वर्षांनंतर दूर्मिळ योग; 3 राशींना होणार घसघशीत फायदा title=

मुंबई : महाशिवरात्री प्रतीवर्षीच येते. पण, यंदाची महाशिवरात्री काहीशी हटके आहे. यंदा तब्बल ४७ वर्षांनतर योग जुळून येत आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये जोरदार उत्साह आहे. पण, विशेष असे की, एकूण १२ राशींपैकी तिन राशी मात्र यंदा नशिबवान ठरणार आहेत. करण, महाशिवरात्रीनंतर या राशींना जबरदस्त फायदा संभवतो.

दोन प्रकारची महाशिवरात्री

यंदाची मचहाशिवरात्री १४ फेब्रुवारीला येत आहे. मात्र, काही लोक ती १३ फेब्रुवारीलाही साजरी करणार आहेत.  यंदा दोनदा महाशिवरात्री साजरी होणार आहे. त्याची नावेही दोन प्रकारची आहेत. एक श्रावण मास दुसरा फाल्गून मास. 

या राशींना होणार फायदा

वृषभ  - ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार वृषभ राशीच्या लोकांना महाशिवरात्रीनंतर अच्छे दिन येणार आहेत. वृषभ राशीच्या मंडळींना नोकरीत प्रमोशन आणि धन लाभाची शक्यता आहे. या मंडळींना वैवाहीक आयुष्यातही लाभ होण्याची शक्यता आहे. दाम्पत्यांच्या जीवन, वैवाहीक जीवन, व्यापार यात फायदा होईल. डेकोरेशन, कारमेन्ट्स, कलाजगत, आभूषण, सौदर्य प्रसाधन, कम्युनिकेशनवर आधारीत कामकाज आदी लोकांना चांगले यश मिळेल. या मंडळींना आकस्मिक धनलाभाचीही शक्यता आहे. 

सिंह - सिंह राशीच्या मंडळींसाठी महाशिवरात्री विशेष लाभदाई ठरणार आहे. शिवरात्रीनंतर सिंह राशींची मंडळी स्वत:चा चांगली प्रगती करतील. महाशिवरात्रीनंतर सिंह राशींची मडळी जीपण योजना बनवतील त्यात त्यांना लाभच होईल. आर्थिक उन्नती होईल. आर्थिक स्वरूपातील प्रलंबीत राहिलेली कामे मार्गी लागतील.

वृश्चिक - या मंडळींना महाशिवरात्रीनंतर प्रत्येक कार्यात सफलता मिळेल. नोकरी आणि व्यवसायात वृद्धी होईल. आर्थिक लाभाच्या ऑफर येतील. फेब्रुवारी महिन्यानंनतर या राशीची मंडळी प्रसन्न आणि उत्साही वर्तन करतील. व्यवसायात अचानक धनलाभाची शक्यता. या राशीच्या लोकांचे नशीब बदलणारा काळ असे म्हटल्यास वावगे ठरू नये.