Mahalaxmi Yoga : देवउठनी एकादशीला महालक्ष्मी योग! 148 दिवसानंतर निद्रेतून उठणारे विष्णूदेव 'या' लोकांना करणार श्रीमंत

Mahalaxmi Yoga / Dev Uthani Ekadashi 2023 :  यंदाची कार्तिकी एकादशी अतिशय खास आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यादिवशी महालक्ष्मी योगासह सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग असणार आहे. त्यामुळे विष्णूदेव काही लोकांवर धनवर्षाव करणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Nov 20, 2023, 10:50 AM IST
Mahalaxmi Yoga : देवउठनी एकादशीला महालक्ष्मी योग! 148 दिवसानंतर निद्रेतून उठणारे विष्णूदेव 'या' लोकांना करणार श्रीमंत title=
Mahalakshmi Yoga on Devuthani Ekadashi After 148 days Lord Vishnu who wakes up from sleep will make these people rich

Mahalaxmi Yoga / Dev Uthani Ekadashi 2023 : दिवाळीनंतर कार्तिकी एकादशी (Ekadashi 2023), तुळशी विवाह (Tulsi Vivah) आणि देव दिवाळी (Dev Deepawali), त्रिपुरारी पौर्णिमेचे (Kartika Purnima) वेध सगळ्यांना लागतात. कार्तिक महिन्याला सुरुवात झाली असून शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही देवउठनी एकादशी म्हणून ओळखली जाते. 148 दिवसानंतर निद्रेतून विष्णदेव यादिवशी जागे होतात असं म्हणतात. हा दिवशी महालक्ष्मी योगासह, सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांवर विष्णूदेवाची कृपा बरसणार आहे. (Mahalakshmi Yoga on Devuthani Ekadashi After 148 days Lord Vishnu who wakes up from sleep will make these people rich)

कार्तिकी एकादशी तिथी

पंचांगानुसार कार्तिक शुक्ल एकादशी तिथी 22 नोव्हेंबरला रात्री 11.03 पासून दुसऱ्या दिवशी 23 नोव्हेंबरला गुरुवारी रात्री 9.01 वाजेपर्यंत असणार आहे. उदयतिथीनुसार देवउठनी एकादशी ही 23 नोव्हेंबरला साजरी करण्यात येणार आहे. यंदाची देवउठनी एकादशी कोणासाठी भाग्यशाली ठरणार आहे जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Zodiac) 

देवउठनी एकादशी मेष राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ होणार आहे. तुम्हाला कठोर परिश्रमाचं फळ लाभणार आहे. व्यापारी वर्गासाठी विष्णूदेवाची कृपा बरसणार आहे. व्यवसायात वाढ होणार आहे. या लोकांना व्यवसायात अनेक संधी मिळणार आहे. आर्थिक बाजू भक्कम होणार आहे. 

कर्क रास (Cancer Zodiac)   

कर्क राशीच्या लोकांसाठी देवउठनी एकादशी शुभ ठरणार आहे. तुम्हाला सर्व कामात विष्णूची साथ मिळणार आहे. पैसे कमाईचे नवीन मार्ग गवसणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. विद्यार्थ्यांना मेहनतीचं फळ मिळणार आहे. देवउठनी एकादशी तुमच्यासाठी आयुष्यात सकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे. नात्यातील तणार दूर होणार आहे. व्यवसायिकांना प्रचंड नफा होणार आहे. 

तूळ रास (Libra Zodiac)

या राशीच्या लोकांना देवउठनी एकादशी आणि महालक्ष्मी योग फायदेशीर ठरणार आहे. वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी लाभणार आहे. या काळात लोकांना व्यवसाय आणि नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. मोठा धनलाभ होणार असून तुमची आर्थिक स्थिती बळकट होणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. 

हेसुद्धा वाचा - Mars Uday 2024 : नवीन वर्ष 2024 च्या सुरुवातीला होणार मंगळाचा उदय, 'या' राशींना मालामाल होण्याची संधी

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)

देवउठनी एकादशी आणि महालक्ष्मी योग या राशीच्या लोकांसाठी नशिबवान ठरणार आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरीची उत्तम संधी मिळणार आहे. यासोबतच रखडलेली कामेही पूर्ण होणार आहे. कामाच्या ठिकाणी नफा होण्यासोबतच सन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)