अवघ्या काही तासांतच शेवटचं चंद्रग्रहण! थोड्याच वेळात सुरु होणार सुतक काळ, काय करावं? काय करू नये?

Lunar Eclipse 2023 : या वर्षातील शेवटचं आणि दुसरं चंद्रग्रहण काही तासांमध्ये असणार आहे. चंद्रग्रहणाचं सूतक हे ग्रहणाच्या 9 तासांपूर्वी सुरु होतं असतं. शास्त्रानुसार सुतक काळात चुकूनही काही गोष्टी करु नये, अन्यथा तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागेल. 

नेहा चौधरी | Updated: Oct 28, 2023, 03:33 PM IST
अवघ्या काही तासांतच शेवटचं चंद्रग्रहण! थोड्याच वेळात सुरु होणार सुतक काळ, काय करावं? काय करू नये? title=
lunar eclipse 2023 Sutak period what to do What not to do pregnant women food mandir Chandra Grahan

Lunar Eclipse 2023 : आज शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमेला या वर्षातील शेवटचं आणि दुसरं चंदग्रहण आहे. जे भारतात दिसणार आहे. चंद्रग्रहणाचा सुतक काळ हा ग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अशुभ मानलं गेलं आहे. त्यानुसार सुतक काळात काही गोष्टी वर्ज्य असतात. चुकूनही तुम्ही त्या गोष्टी केल्यास तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.  (lunar eclipse 2023 Sutak period what to do What not to do pregnant women food mandir Chandra Grahan)

चंद्रग्रहण कधी सुरु होणार?

भारतात दिसणार असणार चंद्रग्रहण 28-29 ऑक्टोबरच्या रात्री 01:05 वाजेपासून 02:23 वाजेपर्यंत असणार आहे. हे चंद्रग्रहण मेष राशीत होणार असून हे खग्रास चंद्रग्रहण आहे. 

चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी कधी?

चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी हा 9 तास आधी सुरु होता. म्हणजे थोड्याच वेळात दुपारी 4 वाजेपासून सुतक कालावधी सुरु होईल आणि ग्रहणानंतर तो संपेल. शास्त्रानुसार सुतक काळात शुभ कार्याला वर्ज्य असतं. त्याशिवाय या काळात मंदिरांचे दरवाजे बंद करण्यात येतात. 

चंद्रग्रहणाच्या दिवशी कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल?

गर्भवती महिलांनी स्वत:ची अत्यंत काळजी घ्यावी, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. नाही तर बाळावर वाईट परिणाम होतात असी समज आहे. 
स्वयंपाक करणं आणि खाणे टाळा, असं म्हणतात. 
घरातील मंदिर आणि देवाचे चित्र झाकून ठेवावे. 
सुतक काळात देवाची पूजा करणे अशुभ मानली जाते. 
गरजू लोकांना आर्थिक किंवा गोष्टी दान करा. 
मांसाहार किंवा मद्यपान करु नका.
केस किंवा नखं ​​कापू नका. 
कोणतंही नवीन काम सुरू करू नका.

चंद्रग्रहणाच्या दिवशी काय कराल?

चंद्रग्रहणाच्या दिवशी पूजा आणि ध्यान करा. 
या दिवशी देवाची आराधना करा, मंत्रोच्चार करणे फलदायी मानले जाते.
जास्तीत जास्त वेळ मौन पाळा. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)