Laxmi Narayan Yog 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर आपली राशी बदलतो. यावेळी ग्रहांच्या संयोगामुळे राजयोग तयार होतो. सध्या शुक्र त्याच्या उच्च राशीत आणि गुरू मीन राशीच्या राशीत प्रवेश करणार आहे. 24 एप्रिलपर्यंत मीन या राशीर राहणार आहे. 9 एप्रिल रोजी बुध ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला असून अशा स्थितीत संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार झाला आहे.
ज्योतिष शास्त्रात लक्ष्मी नारायण राजयोगाला विशेष महत्त्व दिलं गेलंय. ज्यावेळी बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह कोणत्याही राशीत एकत्र असतात तेव्हा लक्ष्मी नारायण योग तयार होतो. या योगाने लक्ष्मीच्या आशीर्वाद सोबत राहतो असं म्हटलं जातं. या लक्ष्मी नारायण राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे. जाणून घेऊया या राशीत कोणत्या आहेत.
शुक्र बुध संयोग आणि लक्ष्मी नारायण योगाची निर्मिती स्थानिकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा करिअरमध्ये प्रगतीसह पूर्ण होऊ शकते. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले पैसे परत मिळू शकतात. उच्च अधिकाऱ्यांकडून तुम्हाला लाभ मिळू शकतो. फिल्म इंडस्ट्री, मॉडेल्स आणि सोशल मीडियाशी संबंधित लोकांना खूप फायदा होऊ शकतो. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती स्थानिकांसाठी फलदायी ठरणार आहे. व्यापाऱ्यांना चांगला नफा होणार आहे. नोकरदार लोकांसाठी काळ चांगला राहणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत असेल समाजात मान-प्रतिष्ठा मिळेल. प्रत्येक कामात यश मिळेल. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
बुध-शुक्र यांचा संयोग आणि लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती या राशींसाठी भाग्यवान ठरू शकते. नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. नोकरदारांना बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. तुमच्या मनात सकारात्मक विचार वाढतील.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )