Love Marriage Upay: प्रेमविवाहासाठी आजपासूनच करा हा उपाय, फळ मिळण्यास लागणार नाही वेळ

Prem Vivah 2022 : आपल्या संस्कृतीत लग्नाला खूप महत्व आहे. प्रत्येक व्यक्तीला चांगला जीवनसाथी मिळावा अशी इच्छा असते. आपला लाईफ पार्टनर आपल्यावर प्रेम करणारा असरा, असे प्रत्येकाला वाटत असते. ज्योतिषशास्त्राने प्रेमविवाहासाठी अनेक उपाय सांगितले आहेत.

Updated: Nov 26, 2022, 08:36 AM IST
Love Marriage Upay: प्रेमविवाहासाठी आजपासूनच करा हा उपाय, फळ मिळण्यास लागणार नाही वेळ  title=

Love Marriage Tips: अनेकांचे स्वप्न असते प्रेमविवाह झाला पाहिजे. मात्र, काहींच्याबाबत तो योग नसतो. परंतु काही उपाय केले तर हा योग जळून येऊ शकतो आणि तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते. अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या कुंडली आणि ग्रहमानात अशी परिस्थिती निर्माण होते की एखादी व्यक्ती इच्छा असूनही प्रेमविवाह करु शकत नाही. किंवा कधी कधी एखाद्या व्यक्तीचा योग तयार होत नाही आणि त्याने प्रेमविवाह केला. अशा परिस्थितीत ज्योतिषात काही उपाय सांगण्यात आले आहेत. जे नियमित केल्याने व्यक्तीचा प्रेमविवाह होतो. हे उपाय खूप सोपे आहेत, कोणीही ते कधीही करु शकतात. अधिक जाणून घ्या.

प्रेमविवाहासाठी उपाय

तुमचे लग्न जमत नसेल तर काही ज्योतिषशास्त्रानुसार उपाय केले तर लग्नच काय प्रेमविवाह सुद्धा होईल. स्कंद पुराणात जानकी स्तुतीचे वर्णन केले आहे. जानकी स्तुतीचे विशेष महत्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुम्हाला प्रेमविवाह करायचा असेल तर भगवान श्रीराम आणि सीताजींची नियमित पूजा करा आणि श्री जानकी स्तुतीची जपमाळही जप करा. हे उपाय करून पाहिल्यास प्रेमविवाहात येणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात. एवढेच नाही तर श्री जानकी स्तुतीचा जप केल्याने माणसाच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. अशुभ ग्रहांपासून मुक्ती मिळेल. शत्रूंमुळे होणारे त्रासही दूर होतात. 

श्रीजानकी स्तुति पाठ 

जानकि त्वां नमस्यामि सर्वपापप्रणाशिनीम् ।
जानकि त्वां नमस्यामि सर्वपापप्रणाशिनीम् ॥1॥

दारिद्र्यरणसंहत्रीं भक्तानाभिष्टदायिनीम् ।
विदेहराजतनयां राघवानन्दकारिणीम् ॥2॥

भूमेर्दुहितरं विद्यां नमामि प्रकृतिं शिवाम् ।
पौलस्त्यैश्वर्यसन्त्री भक्ताभीष्टां सरस्वतीम् ॥3॥

पतिव्रताधुरीणां त्वां नमामि जनकात्मजाम् ।
अनुग्रहपरामृद्धिमनघां हरिवल्लभाम् ॥4॥

आत्मविद्यां त्रयीरूपामुमारूपां नमाम्यहम् ।
प्रसादाभिमुखीं लक्ष्मीं क्षीराब्धितनयां शुभाम् ॥5॥

नमामि चन्द्रभगिनीं सीतां सर्वाङ्गसुन्दरीम् ।
नमामि धर्मनिलयां करुणां वेदमातरम् ॥6॥

पद्मालयां पद्महस्तां विष्णुवक्षस्थलालयाम् ।
नमामि चन्द्रनिलयां सीतां चन्द्रनिभाननाम् ॥7॥

आह्लादरूपिणीं सिद्धि शिवां शिवकरी सतीम् ।
नमामि विश्वजननीं रामचन्द्रेष्टवल्लभाम् ।
सीतां सर्वानवद्याङ्गीं भजामि सततं हृदा ॥8॥

इति श्रीस्कन्दमहापुराणे सेतुमाहात्म्ये श्रीजानकीस्तुतिः सम्पूर्णा ।