Navpancham Yog In Leo: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग देखील तयार होतात. यामध्ये देवांचे गुरु ठराविक काळानंतर राशी बदलतात. बृहस्पति सध्या स्वतःच्या मेष राशीत स्थित आहे. 1 मे रोजी दुपारी 1:50 वाजता वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. वृषभ राशीमध्ये गुरुचं गोचर प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच परिणाम करणार आहे.
याशिवाय मायावी ग्रह केतू कन्या राशीत आहे. अशा स्थितीत सिंह राशीच्या नवव्या घराचा संयोग दोघांमध्ये निर्माण होणार आहे. यामुळे नवपंचम योग तयार होणार आहे. नवपंचम राजयोग हा सर्वात शुभ योगांपैकी एक मानला जातो. हा योग तयार झाल्याने प्रत्येक कामात यश मिळेल. जाणून घेऊया नवपंचम राजयोगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.
देवगुरुचे संक्रमण दशम भावात होणार आहे. यामुळे केतूसोबत नवपंचम योग तयार होत आहे. या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. अनेक दिवसांपासून कुटुंबात सुरू असलेली तेढ आता संपुष्टात येऊ शकते. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला अनेक प्रकारचे प्रवास करावे लागतील. परंतु यामध्ये तुम्ही यश मिळवू शकता. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळू शकते.
नवपंचम योग तयार झाल्यामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक समस्यांपासून आराम मिळू शकतो. याशिवाय आर्थिक फायदा होऊ शकतो. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. एकाग्रता आणि बुद्धिमत्ता तीक्ष्ण असेल. तुम्हाला कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळू शकते. तुमच्या मुलांसोबतचे दीर्घकाळचे मतभेद आता संपुष्टात येतील. लव्ह लाईफमध्येही तुम्हाला बरेच फायदे मिळतील. मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते.
मिथुन राशीच्या लोकांनाही खूप फायदा होणार आहे. राजकारणाशी संबंधित लोकांना खूप फायदा होणार आहे. एफडी, शेअर मार्केट किंवा इतर माध्यमांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे फायदे मिळवू शकता. जीवनात अपार यशासोबत आर्थिक लाभही मिळू शकतो. उधारीत पैसे मिळू शकतात. आरोग्यही चांगले राहणार आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळण्याची आशा आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळतील.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )