Kendra Trikon-Viprit rajyog : गुरु आणि शनीदेवांमुळे तयार होणार 2 राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींवर होणार पैशांचा पाऊस

Kendra Trikon-Viprit rajyog : शनी आणि गुरु यांच्यामुळे तयार होणारे त्रिकोण आणि विपरीत राजयोग या दोघांमुळे काही राशीच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. जाणून घेऊया या दोन्ही राजयोगाचा कोणत्या राशींवर कसा एकत्रित परिणाम होणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Aug 11, 2023, 07:57 PM IST
Kendra Trikon-Viprit rajyog : गुरु आणि शनीदेवांमुळे तयार होणार 2 राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींवर होणार पैशांचा पाऊस title=

Kendra Trikon-Viprit rajyog : ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. अशातच ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह एका राशीतून बाहेर पडून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. यावेळी ग्रहांची युती होऊन अनेक प्रकारचे शुभ-अशुभ योग तयार होतात. 

असेच सध्या शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहे. यामुळे त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. याचसोबत अजून एक राजयोग तयार झाला आहे. वैदिक शास्त्रात देवगुरु बृहस्पतीचा राशी परिवर्तनही खूप महत्त्वाचं असूनएका राशीतून दुस-या राशीत जाण्यासाठी गुरु ग्रहाला जवळपास 13 महिने लागतात. दरम्यान गुरू ग्रह सप्टेंबरमध्ये वक्री फिरणार आहे. यावेळी विपरीत राजयोगाची निर्मिती होणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 03 नोव्हेंबर 2023 नंतर शनि कुंभ राशीत राहणार आहे., त्यानंतर तो मार्गी होईल. यासोबतट गुरु 4 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वक्री होणार आहे. 31 डिसेंबर 2023 रोजी सकाळी वक्री स्थितीतून बाहेर पडेल. दरम्यान शनी आणि गुरु यांच्यामुळे तयार होणारे त्रिकोण आणि विपरीत राजयोग या दोघांमुळे काही राशीच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. जाणून घेऊया या दोन्ही राजयोगाचा कोणत्या राशींवर कसा एकत्रित परिणाम होणार आहे. 

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी हे दोन्ही राजयोग अत्यंत शुभ मानले जातायत. या काळात जीवनात प्रचंड बदल घडणार आहे. कोर्टातील काही खटल्यांमध्ये यश मिळणार आहे. यावेळी अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. तुमच्या सन्मानात वाढ होईल. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर फायदा होईल. जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. 

वृषभ रास

शनीचा त्रिकोण राजयोग आणि गुरुचा विपरीत राजयोग यामुळे या राशीला खूप फायदा होणार आहे. उत्पन्न वाढवण्याची, करिअरमध्ये वाढ आणि व्यवसायात अमाप संपत्ती मिळण्याची संधी मिळू शकते. नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. नवीन आणि चांगल्या नोकरीच्या ऑफर येत्या काही दिवसात मिळू शकतात. बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. 

कुंभ रास

शनीचा त्रिकोण राजयोग आणि विपरीत राजयोग शुभ सिद्ध होणार आहे. या दोन्ही शुभ योगामुळे जीवनात प्रत्येक टप्प्यावर प्रगती होणार आहे. तुम्हाला नवीन नोकरीचे गिफ्ट मिळू शकते. व्यवसायात आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. आत्मविश्वासात वाढ होणार आहे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होऊ शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात.

मीन रास

विपरिज राजयोग आणि त्रिकोण राजयोगामुळे स्थानिकांसाठी शुभ सिद्ध होणार आहे. या काळात तुम्हाला आकस्मिक पैसा मिळू शकतो. आर्थिक प्रगती होण्याची शक्यता आहे. कोणत्या ठिकाणी अडकलेले पैसे मिळू शकतात. व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. रखडलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला काही महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )