Kendra Trikon-Gajlaxmi Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्यांच्या ठराविक वेळेनुसार राशीमध्ये बदल करतात. कुंडलीमध्ये गुरु ग्रहाला विशेष महत्त्व आहे. गुरु हा ज्ञान, बुद्धी, अध्यात्म, शिक्षण, संपत्ती आणि धर्माचा कारक मानला जातो. गुरु ग्रहाला एका राशीतून दुस-या राशीत जाण्यासाठी साधारण 13 महिने लागतात.
सध्या गुरू मेष राशीमध्ये वक्री स्थितीत आहे आणि 31 डिसेंबर रोजी तो मार्गस्थ होणार आहे. गुरुच्या मार्गी स्थितीमुळे गजलक्ष्मी आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहेत. या दोन राजयोगांचे काही राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या 2 राशी लकी असणार आहेत.
गुरुच्या मार्गी स्थितीमुळे गजलक्ष्मी आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. व्यावसायिकांसाठी काळ अनुकूल राहील, आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायाचा विस्तार किंवा नवीन करार निश्चित होऊ शकतो. गुंतवणुकीसाठीही काळ अनुकूल राहणार आहे. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये यश मिळेल.
गजलक्ष्मी आणि केंद्र त्रिकोण राजयोगाच्या निर्मितीमुळे 2024 च्या सुरुवातीला अनेक शुभवार्ता मिळू शकतात. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. करिअरसाठी काळ अनुकूल राहणार आहे. यावेळी चांगला आर्थिक लाभ होणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळू शकतं. विद्यार्थ्यांना उच्च संस्थेत प्रवेश घेण्यास यश मिळू शकते. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळेल. चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात.
गुरु मार्गीमुळे गजलक्ष्मी राजयोग केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार असून या राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी गुंतवणुकीतून तुम्हाला अचानक नफा मिळेल. व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची अपेक्षा करू शकता. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. बेरोजगारांना नवीन नोकरीची भेट मिळू शकते. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होईल. तुमच्या नोकरीत नवीन चांगली बातमी मिळू शकेल.
गुरुच्या मार्गी अवस्थेमुळे केंद्र त्रिकोण आणि गजलक्ष्मी राजयोगाची निर्मिती सौभाग्य मिळवून देऊ शकते. धार्मिक कार्यात रुची वाढेल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला देश-विदेशात प्रवास करावा लागू शकतो. रखडलेल्या कामांना गती मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. विद्यार्थ्यांना यावेळी कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकते. कुटुंबात काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतो.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )