मुंबई : प्रत्येक घरात तिजोरी किंवा पैसा ठेवण्याची जागा ठरलेली असते. या ठिकाणी पैशांशिवाय मौल्यवान वस्तूही ठेवल्या जातात. असे म्हणतात की तिजोरी कधीही रिकामी ठेवू नये, कारण धनाची देवी लक्ष्मी कोपते. पैशाच्या सुरक्षिततेशी संबंधित असे काही उपाय शास्त्रात सांगण्यात आले आहेत. ते केल्याने लक्ष्मीचा कृपाशिर्वाद कायम राहतो. कायमच पैसा येत राहतो. तसेच तिजोरी कधीही रिकामी नसते.
दोन सुपारी गौरी आणि गणेशाचे रूप मानून त्यांची पूजा करावी. पूजेनंतर या दोन सुपारी तिजोरीत ठेवाव्यात. असे मानले जाते की ज्या ठिकाणी गणेशाचा वास असतो, तेथे त्याच्यासोबत देवी लक्ष्मीचाही कायम निवास असतो.
शुक्रवारी 5 कवड्या, एक चांदीचे नाणे, थोडे कुंकू आणि 3 पिवळी हळद बांधून तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा. त्याचा परिणाम काही वेळात दिसून येईल. यासोबतच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहील.
शंख योग्य दिशेने ठेवल्याने देवी लक्ष्मी स्वतः त्याकडे आकर्षित होते. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने रंक देखील राजा होतो. हा उपाय खूप चमत्कारिक मानला जातो. दक्षिणावर्ती शंखाचा हा उपाय सोम पुष्य नक्षत्रात केल्यास अधिक फायदा होतो.
बहेराचे झाड खूप चमत्कारिक मानले जाते. रवि-पुष्य नक्षत्रात घरामध्ये त्याच्या मुळाची पूजा करा. यानंतर लाल कपड्यात बांधून ठेवा आणि घराच्या स्टोरेज रूममध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवा. असे केल्याने घरात समृद्धी राहते.
कोणत्याही महिन्यातील शुक्रवारी शुभ मुहूर्तावर लाल कपड्यात नारळाचे फळ बांधावे. यानंतर त्यावर हळद - कुंकू लावून कापूर आणि संपूर्ण लवंगा अर्पण करून धूप-दीप दाखवून तिजोरीत ठेवा. या उपायाने पैसा लवकर मिळत राहतो.